Finally, 'Mohabbate Girl' Kim Sharma did not divorce her husband? | अखेर ‘मोहब्बते गर्ल’ किम शर्मा देणार पतीला घटस्फोट?

‘मोहब्बते’द्वारे बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री किम शर्मा गेल्या काही दिवसांपासून आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. ताजी बातमी खरी मानाल तर, किम पती अली पुंजानीपासून घटस्फोट घेतेय. या घटस्फोटाची सगळी कायदेशीर कारवाई पूर्ण झालीय. किमने केन्यामध्ये राहणा-या पतीचे घर सोडलेय. अर्थात तूर्तास किमने या बातमीला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.  
किम शर्मा गेल्या काही दिवसांपासून उद्योगपती व फॅशन डिझाईनर अर्जुन खन्ना याला डेट करत असल्याची बातमी आहे. या ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान किमच्या घटस्फोटाची बातमी आली आहे. चर्चा खरी मानाल तर अली पुंजानीने एका वेगळ्या महिलेसाठी किमला सोडून दिल्याचेही कळतेय. यानंतर आर्थिकदृष्ट्या स्वत:ला असुरक्षित समजत किमने अलीला घटस्फोटाची नोटीस पाठवली.
अलीने किमसोबत लग्न करण्यासाठी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. म्हणजेच किमसोबतचे अलीचे हे दुसरे लग्न आहे. पण आता हे दुसरे लग्न मोडून अली तिसºया लग्नाच्या तयारीत आहे. किम अलीसोबत केन्यामध्ये राहायची. त्याच्याच कंपनीत सीईओ म्हणून ती कार्यरत होती. पण आता केन्यासोबतच हे सीईओपद  सोडून किम मुंबईत परतली आहे. पतीपासून विभक्त झाल्यानंतर किमला आता काही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही कळतेय. केवळ एक आठवड्याच्या डेटींगनंतर किम आणि अली यांनी २०१० मध्ये लग्न केले होते. यानंतर किमने मुंबईसोडून केन्याला तिच्या पतीसोबत राहायला गेली. मध्यंतरी किम पतीलासोडून दुसºया कुणाला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. तिच्या आयुष्यात फॅशन डिझाईनर अर्जुन खन्नाने एन्ट्री घेतल्याचे बोलले जात आहे. डिझायनर अर्जुन खन्ना हा देखील विवाहित आहे. अलीकडे अनेकदा किम आणि अर्जुन यांना  एकत्र पाहण्यात आले. 

ALSO READ: किम शर्मा म्हणते, मी कुठल्याही आर्थिक संकटात नाहीय!

किमचे नाव अनेक व्यक्तींशी जोडण्यात आले आहे. क्रिकेटर युवराज सिंग नंतर किम शर्मा स्पॅनिश बॉयफ्रेन्ड कार्लोस मार्टिनला डेट करत होती. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यानंतर काय झाले हे कुणालाच कळले नाही. अचानक किमने अली पुंजानीसोबत लग्न केले.  
Web Title: Finally, 'Mohabbate Girl' Kim Sharma did not divorce her husband?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.