मोठमोठ्या डोळ्यांची ही चिमुकली आहे बॉलिवूड टॉपची अभिनेत्री, लवकरच करणार आहे लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 16:20 IST2023-01-30T16:18:15+5:302023-01-30T16:20:01+5:30
Bollywood : खासकरून कलाकारांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीचा असात एक बालपणीचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. पण लोकांना ती ओळखायलाच येत नाहीये.

मोठमोठ्या डोळ्यांची ही चिमुकली आहे बॉलिवूड टॉपची अभिनेत्री, लवकरच करणार आहे लग्न
Bollywood Celebrity Childhood Pic : बॉलिवूडच्या कलाकारांची क्रेझ फॅन्समध्ये किती असते हे तर अनेकदा बघायला मिळतं. फॅन्सना आपल्या आवडत्या स्टारबाबत सगळं काही जाणून घ्यायचं असतं. बॉलिवूड कलाकारांचे फोटोही लोक आवडीने बघतात. खासकरून कलाकारांचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीचा असात एक बालपणीचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे. पण लोकांना ती ओळखायलाच येत नाहीये.
मोठमोठे आणि गोलगोल डोळे आणि निरागस चेहरा....हा फोटो आहे बॉलिवूडची सध्याची टॉपच्या हिरोईनचा. तिच्या 2022 हे वर्ष फारच खास राहिलं. मोठे हिट सिनेमे देणारी ही हिरोईन फॅन्सच्या मनात घर करून तर आहेच सोबच तिच्या अफेअरमुळेही चर्चेत असते. कदाचित तुम्ही ओळखलं नसेल, पण हा फोटो आहे बॉलिवूड स्टार कियारा अडवाणीचा. आज ती जेवढी क्यूट दिसते, तेवढीच ती बालपणीही दिसत होती.
कियारा तिच्या सिनेमामुळेच नाही तर सध्या तिच्या लग्नामुळेही चर्चेत आहे. अशी चर्चा आहे की, कियारा तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबत 6 जानेवारीला लग्न करणार आहे. हे लग्न जैसलमेरच्या सूर्यगढ़ पॅलेसमध्ये होणार आहे. या लग्नाची सगळी तयारी गुपचूपपणे झाल्याचं बोललं जात आहे.
ही जोडी पहिल्यांदा शेरशाह सिनेमात दिसली होती. दोघांची केमिस्ट्री फॅन्सना खूप आवडली होती आणि सिनेमाच्या रिलीजपासूनच दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली होती. अनेकदा दोघांना एकमेकांच्या घरीही स्पॉट करण्यात आलं. पण त्यांनी कधीही त्यांच्या नात्याबाबत स्पष्टपणे सांगितलं नाही.