'डॉन ३'साठी कियारा आडवाणीने घेतली तब्बल इतकी फिस, आकडा ऐकून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 12:03 PM2024-03-05T12:03:29+5:302024-03-05T12:10:25+5:30

कियारा लवकरच 'डॉन ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kiara Advani will be charging Rs. 13 crores for her role in Don 3 | 'डॉन ३'साठी कियारा आडवाणीने घेतली तब्बल इतकी फिस, आकडा ऐकून व्हाल हैराण

'डॉन ३'साठी कियारा आडवाणीने घेतली तब्बल इतकी फिस, आकडा ऐकून व्हाल हैराण

बाॅलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी ही कायमच चर्चेत असते. कियारा आडवणी याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. कियाराचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. कियारा आडवाणी ही एका चित्रपटासाठी कोटींमध्ये  फिस घेते. आता कियारा लवकरच 'डॉन ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासाठी कियाराने मोठी रक्कम आकारल्याचे सांगण्यात येत आहे. हा आकडा खरोखरच खूप मोठा आहे.

'डॉन 3' चित्रपटासाठी कियाराला तब्बल 13 कोटी रुपये मानधन मिळाल्याचे वृत्त समोर येत आहे. बॉलिवूड हंगामाच्या एका अहवालानुसार 'डॉन 3'मधील तिच्या भूमिकेसाठी कियारा अडवाणीला तिने आतापर्यंत केलेल्या सर्व सिनेमांपेक्षा जास्त मानधन देण्यात येत आहे.   अभिनेत्रीने ॲक्शन सीनच्या तयारीसाठी ही तगडी फी वसूल केली आहे. एवढेच नाही तर 'वॉर 2'साठी मिळणाऱ्या फीपेक्षा ही रक्कम 50 टक्के जास्त असल्याचा दावाही करण्यात आला आहे.

 'डॉन 3'चे बजेट खूप जास्त असून हा सर्वात महागडा चित्रपट असेल, असे सांगितले जात आहे. सूत्रांनी सांगितले की, शाहरुख खानसोबत 'डॉन १' आणि 'डॉन २' चांगल्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता, परंतु फरहानला 'डॉन ३' जागतिक स्तरावर बनवायचा आहे. याआधीच्या दोन्ही 'डॉन' चित्रपटांमध्ये अनेक सरप्राईज होते, यावेळीही प्रेक्षकांना अशीच सरप्राईज मिळणार आहेत.

'डॉन ३'चे बजेट २७५ कोटी रुपये असेल असे सांगितले जात आहे. या फ्रँचायझीचा पहिला सिनेमा २००६ मध्ये रिलीज झाला होता, जो १९७८ मध्ये रिलीज झालेल्या अमिताभ बच्चनच्या 'डॉन'चा रिमेक होता. यानंतर २०११ मध्ये 'डॉन २' रिलीज झाला.

Web Title: Kiara Advani will be charging Rs. 13 crores for her role in Don 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.