आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 11:14 IST2025-10-21T11:13:45+5:302025-10-21T11:14:14+5:30
आई झाल्यानंतर कियारा आता पहिल्यांदाच चाहत्यांसमोर आली आहे.

आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसात अनेक अभिनेत्रींनी गुडन्यूज दिली आहे. दोनच दिवसांपूर्वी अभिनेत्री परिणीती चोप्राने मुलाला जन्म दिला. तर कतरिना कैफही आई होणार आहे. सोनम कपूरही प्रेग्नंट असल्याच्या चर्चा आहेत. जुलै महिन्यात म्हणजेच तीन महिन्यांपूर्वीच अभिनेत्री कियारा अडवाणीलाही मुलगी झाली. आई झाल्यानंतर कियारा आता पहिल्यांदाच चाहत्यांसमोर आली आहे. दिवाळीनिमित्त तिने सिद्धार्थ मल्होत्रासोबत व्हिडिओ पोस्ट केला आहे.
कियारा अडवाणीने १५ जुलै रोजी मुलीला जन्म दिला. यानंतर तिने संपूर्ण वेळ लेकीसाठी दिला. गेल्या तीन महिन्यांपासून कियारा कुठेच दिसली नव्हती. तिचा 'वॉर २'रिलीज झाला मात्र त्याच्याही प्रमोशनला ती दिसली नाही. आता तीन महिन्यांनी चाहत्यांना तिची झलक दिसली आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर कियाराने पोस्ट शेअर केली आहे. पिवळ्या रंगाच्या अनारकली सूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. लांब कानातले, टिकली लावत तिने लूक पूर्ण केला आहे. तर सिद्धार्थ मल्होत्रानेही त्याच रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे. नवऱ्यासोबत कियाराने छान पोज देत व्हिडिओ पोस्ट केला आहे. 'हॅपी दिवाली' म्हणत तिने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
इतक्या महिन्यांनी न्यू मॉमची झलक पाहून चाहते खूश झाले आहेत. तसंच कियाराच्या चेहऱ्यावर आई झाल्याचं एक वेगळंच तेज दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांची चिमुकली लेक मात्र दिसत नाही. तसंच दोघांनी अद्याप लेकीचं नावही रिव्हील केलेलं नाही. 'कियारा आम्ही तुला खूप मिस केलं','ओएमजी! अखेर पोस्ट केली. येल्लो आऊटफिटमध्ये किती क्यूट दिसत आहेत','ही दिवाळी स्पेशल बनवलीत, थँक यू न्यू मॉम','नजर न लगे' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.