Kiara Advani : कियाराचा हट्ट अन् लग्नासाठी तयार झालं ‘रांझा’ हे गाणं...; वाचा, वेडिंग व्हिडीओमागची रिअल स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 06:16 PM2023-02-13T18:16:30+5:302023-02-13T18:24:55+5:30

Siddharth Malhotra And Kiara Advani Wedding Video : बॉलिवूड कपल अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाचा तो स्वप्नवत वाटावा असा व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर ट्रेंड करतोय.

kiara advani got the song ranjha recreated for the entry in her wedding | Kiara Advani : कियाराचा हट्ट अन् लग्नासाठी तयार झालं ‘रांझा’ हे गाणं...; वाचा, वेडिंग व्हिडीओमागची रिअल स्टोरी

Kiara Advani : कियाराचा हट्ट अन् लग्नासाठी तयार झालं ‘रांझा’ हे गाणं...; वाचा, वेडिंग व्हिडीओमागची रिअल स्टोरी

googlenewsNext

Siddharth Malhotra And Kiara Advani Wedding Video : बॉलिवूड कपल अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाचा तो स्वप्नवत वाटावा असा व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. लग्नाच्या रात्री कियारा व सिद्धार्थने लग्नाचे मोजके दोन चार फोटो सोशल मीडियावर फोटो शेअर केलेत. यानंतर दोन दिवसांनी लग्नाचा खास व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या तोंडून ‘व्वा’ हा एकच शब्द बाहेर पडला.

कियाराची शाही एन्ट्री, तिचं नाचत नाचत मंडपात येणं, सिद्धार्थच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद, मंडपात एकमेकांना वरमाला घालतानाचा खट्याळ क्षण, सरतेशेवटी घेतलेलं चुंबन आणि बॅकग्राऊंडला वाजणारं ‘रांझा’ हे गाणं... सगळंच परीकथेसारखं होतं. व्हिडीओतील ‘रांझा’ या गाण्यानं सगळ्यांना वेड लावलं. पण या गाण्यामागची स्टोरी कदाचित तुम्हाला ठाऊक नसावी. कियारा व सिद्धार्थच्या वेडिंग व्हिडीओतील हे गाणं सर्वांना इतकं आवडलं की अनेक जण ते इंटरनेटवर शोधू लागले. पण  ज्या गाण्यावर कियारानं नाचत नाचत मंडपात एन्ट्री घेतली, ते हे गाणं चित्रपटातील नसून खास सिद्धार्थ-कियाराच्या लग्नासाठी तयार करण्यात आलं होतं. त्यामागे एक रंजक गोष्ट आहे. 
सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचे शूटिंग करणाऱ्या व्हिडीओग्राफरने त्याच्या यू ट्यूब चॅनलवर या व्हिडीओमागची रंजक गोष्ट शेअर केली आहे.

काय आहे गाण्यामागची स्टोरी
व्हिडीओग्राफरने सांगितलं,“ कियाराला तिच्या लग्नात रांझा गाण्यावर नाचत नाचत मंडपात एन्ट्री घ्यायची होती. तिने मला ही कल्पना सांगितली. पण माझ्यामते, रांझा हे एक सॅड सॉग आहे. मी ही गोष्ट तिच्या लक्षात आणून दिली. पण तिला हेच गाणं हवं होतं. हे आमचं दोघांचं गाणं आहे, मला हेच गाणं हवं, असं ती म्हणाली.  मग आम्ही या गाण्याचे त्या प्रसंगाला साजेसे बोल लिहिले. ते गाणं नव्याने रेकॉर्ड केलं आणि प्रत्येकाचंच स्वप्न पूर्ण झालं.”
 सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचा हा व्हिडीओ सुपरहिट झाला. अजूनही या व्हिडीओवर ट्रेंड करतोय.  

Web Title: kiara advani got the song ranjha recreated for the entry in her wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.