Kiara Advani Sidharth VIDEO: सिद्धार्थ मल्होत्रा- कियारा अडवाणीची लगीनघाई, ‘या’ तारखेला बांधणार लग्नगाठ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 12:57 IST2022-12-25T12:57:18+5:302022-12-25T12:57:54+5:30
Kiara Advani And Sidharth Malhotra : सतत एकमेकांसोबत स्पॉट होणारं सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी हे लव्ह बर्ड्स येत्या जानेवारीत लग्न करण्याचं मानलं जात आहे आणि कदाचित लगीनघाई सुरू झालीये.

Kiara Advani Sidharth VIDEO: सिद्धार्थ मल्होत्रा- कियारा अडवाणीची लगीनघाई, ‘या’ तारखेला बांधणार लग्नगाठ?
सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra)आणि कियारा अडवाणी (Kiara Advani ) दोघंही प्रेमात आहेत, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. अद्याप अधिकृतपणे दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिली नाही. पण आता हे नातं लग्नापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. सतत एकमेकांसोबत स्पॉट होणारं हे लव्ह बर्ड्स येत्या जानेवारीत लग्न करण्याचं मानलं जात आहे आणि कदाचित लगीनघाई सुरू झालीये.
होय, सिद्धार्थ व कियाराच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच दोघं जणं फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राच्या घरी दिसले. शनिवारी रात्री हे जोडपं मनीष मल्होत्राच्या घरातून बाहेर पडताना स्पॉट झालं. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने या दोघांचा व्हिडीओ शेअर केला आहे.
व्हिडीओत सर्वप्रथम कियारा दिसते. पांढरा टॉप आणि पांढरी पॅन्ट अशा लुकमध्ये कियारा मनीष मल्होत्राच्या घरातून बाहेर पडून आपल्या कारकडे निघते. पापाराझींना ती हसत हसत पोझ देते. काही वेळानंतर मनीष मल्होत्रा बाहेर पडतो. तो सुद्धा पापाराझींना पोझ देतो.
हा व्हिडीओ समोर येताच, कदाचित कियारा व सिद्धार्थने लग्नाची तयारी सुरू केल्याचं मानलं जात आहे.
कियारा आणि सिद्धार्थ जानेवारी महिन्यात घेणार सात फेरे?
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे त्यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. अशातच कियारा आणि सिद्धार्थ येत्या 15 जानेवारीला लग्न करणार असल्याची चर्चा आहे. याआधीदेखील नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. अद्याप त्यांच्या लग्नाची अधिकृत तारीख समोर आलेली नाही. ‘लस्ट स्टोरीज’च्या रॅपअप पार्टीत कियारा आणि सिद्धार्थची पहिली भेट झाली. त्यानंतर ‘शेरशाह’ सिनेमाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली. या सिनेमात दोघेही मुख्य भूमिकेत होते.