खुशी कपूर आणखी एका स्टारकीडसोबत करणार रोमान्स, सिनेमाचं नावही ठरलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 20:11 IST2024-02-15T20:09:08+5:302024-02-15T20:11:32+5:30

खुशीची आणखी एका स्टारकीडसोबत जमली जोडी

Khushi Kapoor will romance with Ibrahim Ali Khan in next movie nadaniyaa | खुशी कपूर आणखी एका स्टारकीडसोबत करणार रोमान्स, सिनेमाचं नावही ठरलं!

खुशी कपूर आणखी एका स्टारकीडसोबत करणार रोमान्स, सिनेमाचं नावही ठरलं!

बॉलिवूडमध्ये स्टारकीड्सचा बोलबोला आहे. अनेक कलाकारांच्या लाडक्या मुलांनीही आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयात पदार्पण केलं. काही दिवसांपूर्वीच स्टारकीड्सचा 'द आर्चीज' (The Archies) हा सिनेमा रिलीज झाला. यामधून अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, शाहरुख खानची लेक सुहाना खान आणि श्रीदेवी यांची लेक खुशी कपूरने (Khushi Kapoor) बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. आता खुशी कपूरचा (Khushi Kapoor) आगामी सिनेमा आणखी एका स्टारकिडसोबत असणार आहे. 'द आर्चीज' मधील तिचं काम प्रेक्षकांना खूप आवडल्याने आता तिच्या आगामी सिनेमाची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

सैफ अली खान आणि अमृता सिंगचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत असतो. त्याने अद्याप एकही सिनेमा केललेला नाही मात्र त्याच्या गुड लूक्समुळे आतापासूनच त्याची क्रेझ पाहायला मिळत आहे. तसंच त्याने फिटनेसमध्येही अनेकांना मागे टाकलं आहे. सैफ अली खानसारखेच गुडलूक्स असलेला इब्राहिमही आता बॉलिवूडमध्ये लवकरच पदार्पण करत आहे. खुशी कपूर तो आगामी सिनेमात झळकणार आहे. झूम रिपोर्टनुसार, या सिनेमाचं नाव 'नादानियां' असणार आहे.

इब्राहिम अली खानने करण जोहरच्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' मध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. आता तो कॅमेऱ्यासमोर येत तरुणींवर भुरळ घालायला येणार आहे. त्याची आधीच एवढी फॅन फॉलोइंग असताना आता फिल्म इंडस्ट्रीत आल्यानंतर यामध्ये किती भर पडेल हे लवकरच कळेल. सध्या इब्राहिम त्याच्या अफेअरमुळेही चर्चेत आहे. टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीसोबत इब्राहिम अनेकदा दिसला आहे. दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. 

Web Title: Khushi Kapoor will romance with Ibrahim Ali Khan in next movie nadaniyaa