KGF 2 स्टार यशने पत्रकारांची मागितली माफी, जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 14:28 IST2022-04-12T14:27:18+5:302022-04-12T14:28:28+5:30

KGF 2 star Yash : यश माफी मागताना म्हणाला की, 'मला माहीत नव्हतं की, इव्हेंट ११ वाजता आहे. तो माफी मागत म्हणाला की, मी माफी मागतो.

KGF 2 star Yash apology reporters in press meet for late coming | KGF 2 स्टार यशने पत्रकारांची मागितली माफी, जाणून घ्या कारण

KGF 2 स्टार यशने पत्रकारांची मागितली माफी, जाणून घ्या कारण

साऊथचा सुपरस्टार आणि केजीएफ स्टार यश (Yash) सध्या त्याच्या आगामी KGF 2 च्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे. यासाठी आंध्र प्रदेशात एका प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन केलं होतं. यश या इव्हेंटला आला. पण त्याला यायला दीड तास उशीर झाला. अशात यशने नाराज झालेल्या मीडियाला विनम्रतेने माफी मागितली.

यश माफी मागताना म्हणाला की, 'मला माहीत नव्हतं की, इव्हेंट ११ वाजता आहे. तो माफी मागत म्हणाला की, मी माफी मागतो. मला नव्हतं माहीत. मला जिथे जाण्यास सांगितलं जात आहे तिथे मी जात आहे.  जर शो दहा मिनीट डिले झाले असेल तर त्यासाठी मी माफी मागतो. उशीर झाल्याचं मला आता समजत आहे. मला वेळेचं महत्व माहीत आहे. आम्ही प्रायव्हेट जेटने येत असल्याने टेक-ऑफ आणि लॅंडिंगला थोडा वेळ लागत आहे. तुम्हाला वाट बघावी लागली त्यासाठी माफी मागतो'.

दिग्दर्शक प्रशांत नीलचा KGF 2 हा सिनेमा १४ एप्रिलला रिलीज होत आहे. रॉकीची पुढील कहाणी काय असेल, सोन्याच्या खाणीत काय होणार हे सगळं यात दाखवण्यात येणार आहे. संजय दत्त या सिनेमात 'अधीरा'च्या भूमिकेत आहे. या भूमिकेची आणि त्याच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे. 

KGF 2 मध्ये यशसोबत रवीना टंडन,  श्रीनिधी शेट्टी, मालविका अविनाश, अच्युत कुमार, प्रकाश राज आणि अनंत नागसारखे दिग्गज कलाकार दिसणार हेत. सिनेमाबाबत मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. त्यामुळे अॅडव्हांस बुकिंग जोरात होत आहे. सिनेमाचं तिकीट १ हजार रूपयांनाही विकलं जात आहे. रॉकी भाईला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी लोक आतुर झाले आहेत.
 

Web Title: KGF 2 star Yash apology reporters in press meet for late coming