Kesari Trailer: पाहा, अक्षय कुमारच्या ‘केसरी’चा दमदार ट्रेलर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 11:49 IST2019-02-21T11:48:56+5:302019-02-21T11:49:20+5:30
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘केसरी’चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार पुन्हा एकदा एका दमदार अवतारात दिसतोय.

Kesari Trailer: पाहा, अक्षय कुमारच्या ‘केसरी’चा दमदार ट्रेलर!!
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘केसरी’चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या ट्रेलरमध्ये अक्षय कुमार पुन्हा एकदा एका दमदार अवतारात दिसतोय.
१८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारित असलेल्या या चित्रपटात अक्षयने ईशर सिंगची भूमिका साकारली आहे. आपल्या २१ सैनिकांना घेऊन ईशर सिंग १० हजार अफगाणी सैन्याशी भीडतो. या युद्धातले अनेक प्रसंग आणि अक्षयच्या तोंडचे संवाद अंगावर शहारे आणतात. विशेषत: ‘मेरी पगडी भी केसरी और जो लहू बहेगा वो भी केसरी’ हा अक्षयचा संवाद अंगावर रोमांच उभे करतो. ‘किसी गोरे ने मुझसे कहा था कि हिदुस्तान में सिफ डरपोक पैदा होते है. ये वक्त जवाब देने का है,’ या संवादाने ट्रेलरची सुरुवात होते.
ट्रेलरमधील युद्धाची दृश्ये अतिशय मार्मिक आहे आणि शिख सरदाराच्या भूमिकेत अक्षयचा ‘दबंग’ अंदाजही थेट हृदयाला भिडणारा आहे. अनुराग सिंगने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मीती आहे. अक्षय कुमारसोबत परिणीती चोप्रा या चित्रपटात लीड रोलमध्ये दिसणार आहे.
येत्या २१ मार्चला होळीच्या मुहूर्तावर अक्षयचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सन १८९७ मध्ये सारागढीचे युद्ध झाले होते. ब्रिटिश इंडियन आर्मीसाठी लढणाºया ३६ शीख रेजिमेंटने या युद्धात आपल्या शौर्याची ओळख करून दिली होती. आपल्या २१ सैनिकांना घेऊन ईशर सिंगने १० हजार अफगाणी सैन्याला दोन वेळा पराभूत केले होते. दुर्दैवाने तिसºया वेळेस त्याचा पराभव झाला पण ब्रिटिश आर्मी येईपर्यंत त्यांनी १० हजार सैन्याला थोपवून ठेवले होते.