कॅटरिना कैफचा अजब हट्ट! आता ‘या’ व्यक्तीसोबत जायचंय डिनर डेटवर!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 17:39 IST2019-06-02T17:39:13+5:302019-06-02T17:39:48+5:30

बॉलिवूडची बार्बी डॉल कॅटरिना हिला म्हणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत डिनर डेटवर जायचंय. अशीच इच्छा तिने नुकतीच व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे कॅटरिनाला कोणत्याही अभिनेत्यासोबत डिनर डेटला जायचं नसून चक्क नरेंद्र मोदींसोबत डिनर डेटला जायचं आहे.

Katrina Kaifa is unbelievable! Now go with 'this' person on dinner date !! | कॅटरिना कैफचा अजब हट्ट! आता ‘या’ व्यक्तीसोबत जायचंय डिनर डेटवर!!

कॅटरिना कैफचा अजब हट्ट! आता ‘या’ व्यक्तीसोबत जायचंय डिनर डेटवर!!

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बाबतीत जे ऐकावं ते नवलच असते. त्यांची एखाद्या व्यक्तीबद्दलची के्रझ इतकी काही असू शकते का की ते चक्क त्यांच्यासोबत डिनर डेटवर जायला तयार होतात. आता हेच बघा ना, बॉलिवूडची बार्बी डॉल कॅटरिना हिला म्हणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत डिनर डेटवर जायचंय. अशीच इच्छा तिने नुकतीच व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे कॅटरिनाला कोणत्याही अभिनेत्यासोबत डिनर डेटला जायचं नसून चक्क नरेंद्र मोदींसोबत डिनर डेटला जायचं आहे.

सध्या सलमान खान आणि कॅटरिना कैफ त्यांच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. हा चित्रपट ५ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या कॅटरिना आणि सलमानची चर्चा आहे. त्यातच तिने दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत डिनर डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या मुलाखतीमध्ये कॅटरिनाला कोणासोबत डिनर डेटला जायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासोबतच तिला तीन पर्यायही सुचविण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मर्लिन मुनरो आणि कोंडोलीजा राइस या तीन जणांची नावं होती. या तिघांपैकी कॅटरिनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत डिनर डेटवर जायला आवडेल असं सांगितलं.

दरम्यान, सध्या कॅटरिना आणि सलमान त्यांच्या भारतच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. हा चित्रपट येत्या ५ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ, दिशा पटानी, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोवर, तब्बू या कलाकारांची मांदियाळी आहे.  

Web Title: Katrina Kaifa is unbelievable! Now go with 'this' person on dinner date !!