अक्षय कुमारने कापला जॅकलिनचा पत्ता ?, सूर्यवंशीमध्ये या हॉट अभिनेत्री एंट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 15:08 IST2019-03-25T15:05:29+5:302019-03-25T15:08:15+5:30

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' सिनेमात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. सूर्यवंशीच्या घोषणेनंतर या सिनेमात अक्षयच्या अपोझिट कोण दिसणार याची चर्चा सुरु झाली होती.

katrina kaif to star opposite akshay kumar in rohit shetty film sooryavansh | अक्षय कुमारने कापला जॅकलिनचा पत्ता ?, सूर्यवंशीमध्ये या हॉट अभिनेत्री एंट्री!

अक्षय कुमारने कापला जॅकलिनचा पत्ता ?, सूर्यवंशीमध्ये या हॉट अभिनेत्री एंट्री!

ठळक मुद्देअक्षयने कॅटरिनाच्या नावाची शिफारस केल्याची चर्चा आहेकॅटरिनाचे नाव फायनल झाल्याची चर्चा आहे

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' सिनेमात अक्षय एका एसटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. सूर्यवंशीच्या घोषणेनंतर या सिनेमात अक्षयच्या अपोझिट कोण दिसणार याची चर्चा सुरु झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार यात कॅटरिना कैफची जोडी अक्षयसोबत जमण्याची शक्यता आहे. कॅटरिनाचे नाव फायनल झाल्याची चर्चा आहे. याआधी अक्षय आणि कॅटने 'वेलकम', 'तीस मार खान', 'सिंग इज किंग', 'दे दना दन'सारखे अनेक हिट सिनेमे या जोडीने दिले आहेत.


रोहित शेट्टीच्या डोक्यात कॅटरिनाचे नाही तर दुसऱ्याच अभिनेत्रीचे नाव या भूमिकेसाठी डोक्यात होते, पण अक्षयने कॅटरिनाच्या नावाची शिफारस केल्याची चर्चा आहे. या सिनेमासाठी आधी जॅकलिनचे नावदेखील चर्चेत आले होते. मात्र आता कॅटच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी या या सिनेमातील अक्षयचा फर्स्ट लूक आऊट झाला आहे. या अ‍ॅक्शन चित्रपटात अक्षय एटीएस ऑफिसरची भूमिका साकारतोय. चित्रपटात अक्षयचे नाव सूर्यवंशी असेल. दहशतवादाविरोधात तो लढताना दिसेल. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रोहितचा ‘सूर्यवंशी’ रिलीज करण्याचा प्लॅन आहे. मात्र जर असे झाले तर संजय लीला भन्साळी यांच्या 'इंशाअल्लाह' सिनेमासोबत सूर्यवंशीची टक्कर होण्याची शक्यता आहे.    


तामिळ भाषेतील ‘सूर्यवंशी’ याचाच हा हिंदी रिमेक असल्याची चर्चा  होती. पण ही बातमी ऐकताच रोहित प्रचंड संतापला होता. ‘सूर्यवंशी’ कुठल्याही चित्रपटात रिमेक नाही. ही एक ओरिजनल स्टोरी आहे. दीर्घकाळापासून यावर काम सुरु होते, असे त्याने यानंतर स्पष्ट केले होते. तुम्हाला ठाऊक असेलच की, केवळ साऊथमध्येच नाही तर हिंदीतही ‘सूर्यवंशी’नावाचा चित्रपट याआधी बनला आहे. या जुन्या ‘सूर्यवंशी’मध्ये सलमान खान लीड रोलमध्ये होता. 

Web Title: katrina kaif to star opposite akshay kumar in rohit shetty film sooryavansh