'टायगर 3'मध्ये या लूकमध्ये दिसणार कतरिना कैफ, अभिनेत्रीने शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 18:21 IST2021-03-18T18:17:44+5:302021-03-18T18:21:39+5:30
कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे.

'टायगर 3'मध्ये या लूकमध्ये दिसणार कतरिना कैफ, अभिनेत्रीने शेअर केला फोटो
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने इंडस्ट्रीमध्ये आपला ठसा उमटवला असून अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.कतरिना कैफने 'टायगर 3' चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी स्वत: चा एक फोटो शेअर केले आहे. अभिनेत्रीच्या या नव्या पोस्टवरून असा अंदाज वर्तविला जात आहे की 'टायगर 3' मध्ये तिचा लूक असाच काहीसा असणार आहे.
गुरुवारी कतरिना कैफने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोत तिने नवा हेअरकट केल्याचे दिसतेय. फोटो पोस्ट करताना कतरिना कैफने लिहिले, 'नवीन दिवस, नवीन हेअरस्टाईल, नवीन सिनेमा.' अभिनेत्रीच्या या नव्या लूकमुळे आगामी ‘टायगर 3’ सिनेमात ती अशाच लूकमध्ये दिसणार अशी चर्चा रंगली आहे. त्याच्या या फोटोवर मनीष मल्होत्रा, सौफी चौधरी इसाबेल कैफसह अनेक सेलिब्रेटींनी कमेंट्स केल्या आहेत.
'टायगर 3'मध्ये सलमान खान आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत. मेकर्सने मुंबईस्थित स्टुडिओ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटाची टीम सुरुवातीला इस्तंबूलमध्ये शूटिंग करणार होती पण देशातील कोरोनाच्या वाढत्या घटनांमुळे त्याला उशीर झाला.
वर्कफ्रंट बाबत बोलायचे झाले तर, कतरिना सध्या उदयपुरमध्ये 'फोन बूथ'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर देखील आहेत.