कतरिना कैफने बीचवर केलं ग्लॅमरस फोटोशूट, सोशल मीडियावर वारंवार पाहिला जातोय तिचा 'हा' व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 16:41 IST2021-01-19T16:41:08+5:302021-01-19T16:41:46+5:30
लवकरच ती सूर्यवंशी चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसणार आहे.

कतरिना कैफने बीचवर केलं ग्लॅमरस फोटोशूट, सोशल मीडियावर वारंवार पाहिला जातोय तिचा 'हा' व्हिडीओ
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती अनेकदा चाहत्यांसह आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतेच कॅटने फोटोशूट केले आहे. त्याचा व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कतरिना कैफ बीचवर फोटोशूट करताना दिसते आहे. व्हिडिओमध्ये असे दिसते आहे की, कतरिना कधी गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये तर कधी निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट करते आहे.
व्हिडिओमध्ये कतरिना कैफ खूपच सुंदर दिसते आहे. कतरिना कैफने हे फोटोशूट पीकॉक मॅगझीनसाठी केले आहे. चाहते या अभिनेत्रीच्या व्हिडिओवर जोरदार कमेंट करतायेत. कतरिनाचा हा व्हिडिओ 12 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
कतरिना कैफच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचं तर लवकरच ती सूर्यवंशी चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. सूर्यवंशी हा चित्रपट मागील वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित होणार होता पण कोरोनामुळे ते शक्य होऊ शकले नाही. २०२१ मध्ये सूर्यवंशी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याशिवाय कतरिना सध्या भूत पोलिस चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात अभिनेत्रीसोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहेत.