'गुड न्यूज' दिल्यानंतर कतरिना कैफची पहिली झलक, दीर सनीच्या बर्थडे पार्टीत दिसला प्रेग्नेंसी ग्लो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:26 IST2025-09-30T14:25:47+5:302025-09-30T14:26:26+5:30
विकी कौशलच्या भावाच्या वाढदिवशी कतरिनाची पहिली झलक; चेहऱ्यावरचा आनंद पाहून चाहते खूश, वयाच्या ४२ व्या वर्षी होतेय आई!

'गुड न्यूज' दिल्यानंतर कतरिना कैफची पहिली झलक, दीर सनीच्या बर्थडे पार्टीत दिसला प्रेग्नेंसी ग्लो!
Katrina Kaif First Photo After Announcement Of Her Pregnancy : कतरिना कैफ आणि विकी कौशल हे बॉलिवूडमधलं एक सुपरहीट जोडपं आहे. त्यांच्या आयुष्याला आता एक सुखद कलाटणी मिळणार आहे. हे दोघेही लवकरच आई- बाबा होणार आहेत. एक अतिशय छान फोटो शेअर करून कतरिना हिने एका आठवड्यापूर्वी, २३ सप्टेंबर रोजी तिच्या प्रेग्नन्सीची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. तेव्हापासून चाहते व सेलिब्रिटी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. आता, गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर कतरिनाचा पहिला फोटो समोर आला आहे, ज्यात ती खूप आनंदी दिसत आहे.
कतरिनाचा हा फोटो तिचा दीर आणि अभिनेता विकी कौशलचा भाऊ सनी कौशल याच्या वाढदिवसाच्या पार्टीतील आहे. अभिनेत्री मिनी माथुरने सनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत कतरिना कैफ व्यतिरिक्त, मिनी माथुर, सनी कौशल आणि कतरिनाची बहीण इसाबेल कैफ देखील दिसत आहेत. या फोटोमध्ये चाहत्यांना गर्भवती कतरिनाची झलक दिसली. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील प्रेग्नेंसी ग्लो स्पष्टपणे दिसून आला आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी डिसेंबर २०२१ मध्ये लग्न केले होते. लग्नापूर्वी दोघांनी काही काळ डेट केले होते. त्यांच्या गरोदरपणाच्या अफवा अनेक महिन्यांपासून सुरू होत्या, पण २३ सप्टेंबर रोजी त्यांनी इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. कतरिना शेवटची गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या श्रीराम राघवन दिग्दर्शित "मेरी ख्रिसमस" या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटात दिसली होती, ज्यात विजय सेतुपती मुख्य भूमिकेत होता. आता तिचे चाहते तिच्या पहिल्या बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.