नेहा धुपियाच्या कार्यक्रमात कतरिना कैफसोबत झळकणार ही व्यक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 21:00 IST2019-04-26T21:00:00+5:302019-04-26T21:00:03+5:30
नेहाच्या शोचा सध्या तिसरा सिझन सुरू आहे. आता या कार्यक्रमात कतरिना कैफ हजेरी लावणार आहे.

नेहा धुपियाच्या कार्यक्रमात कतरिना कैफसोबत झळकणार ही व्यक्ती
नेहा धुपियाने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले असून ती सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या चॅट शो साठी जास्त चर्चेत आहे. नेहा धुपियाच्या कार्यक्रमात आजवर अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली असून या सेलिब्रेटींनी नेहासोबत आपले अनेक सिक्रेट या कार्यक्रमात शेअर केले आहेत. तसेच या कार्यक्रमात प्रचंड धमाल मस्ती देखील केली आहे. नेहाच्या या शोचा सध्या तिसरा सिझन सुरू आहे. आता या कार्यक्रमात कतरिना कैफ हजेरी लावणार आहे.
कतरिनाने बॉलिवूडमध्ये आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिचा भारत हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भटीस येणार आहे. या चित्रपटात ती सलमान खानसोबत झळकणार असून तिला एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सलमान वेगवेगळ्या सहा लुकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाची चर्चा रंगली असतानाच आता कतरिना नेहाच्या कार्यक्रमात जाऊन तिच्यासोबत खूप गप्पा मारणार आहे. या कार्यक्रमात ती कोणत्या कोणत्या गोष्टी नेहाला सांगते याची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत. कतरिना या कार्यक्रमात एका खास पाहुण्यासोबत झळकणार आहे. ही पाहुणी दुसरी कोणीही नसून एक प्रसिद्ध स्टायलिस्ट आहे. या कार्यक्रमात स्टायलिस्ट अनिता श्रॉफ अडाजानिया कतरिनासोबत झळकणार आहे. अनिताने या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनमध्ये दीपिका पादुकोणसोबत हजेरी लावली होती.
या कार्यक्रमात झळकण्याविषयी कतरिना सांगते, गेल्या सिझनच्या वेळेस मी एखाद्या कार्यक्रमासाठी चित्रीकरण करतेय असे देखील मला वाटले नव्हते. नेहासोबत मी मस्त गप्पा मारल्या होत्या. या वेळी मी दुसऱ्यांदा या कार्यक्रमात झळकणार आहे. या सिझनमध्ये मी जास्त मजा-मस्ती करेन याची मला खात्री आहे. नेहाने माझ्यासाठी काही सरप्राईजेसचा विचार केला असेल तर मी यासाठी नक्कीच तयार आहे.
कतरिनाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून ती आणि अनिता या कार्यक्रमात हजेरी लावणार असल्याचे सांगितले आहे. या कार्यक्रमाच्या या तिसऱ्या सिझनमध्ये कतरिना नंतर राजकुमार आणि इशान, सोनाली बेंद्रे तिच्या मैत्रिणी सुझान खान आणि गायत्री ऑबेरॉय सोबत तसेच जान्हवी आणि खुशी कपूर हजेरी लावणार आहेत.