काय म्हणता, सलमान खान नाही तर हा अभिनेता कतरिनाला वाटतो जवळचा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 16:24 IST2019-07-09T16:23:48+5:302019-07-09T16:24:40+5:30
कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांची जोडी अनेक चित्रपटांत एकत्र झळकली आहे. लवकरच जी जोडी पुन्हा एकदा सूर्यवंशी सिनेमात एकत्र दिसणार आहेत.

काय म्हणता, सलमान खान नाही तर हा अभिनेता कतरिनाला वाटतो जवळचा !
ठळक मुद्देकतरिना 16 जुलैला आपला 36वा वाढदिवस साजरा करणार आहे
कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांची जोडी अनेक चित्रपटांत एकत्र झळकली आहे. हमको दीवाना कर गए, नमस्ते लंडन, वेलकम, सिंग इज किंग, दे दना दन, तीस मारखां असे अनेक चित्रपट दोघांनी एकत्र काम केले. लवकरच जी जोडी पुन्हा एकदा सूर्यवंशी सिनेमात एकत्र दिसणार आहेत. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, रोहित शेट्टी दिग्दर्शित सूर्यवंशी सिनेमात काम करण्यासाठी कट खूप उत्सुक आहे. कट म्हणते, अक्षय कुमार सोबत काम करणं म्हणजे मला घरवापसी झाल्यासारखं वाटतेय.
कतरिना आणि अक्षय कुमारच्या जोडीचा ‘सूर्यवंशी’ पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या अॅक्शन चित्रपटात अक्षय सूर्यवंशी नावाचे पात्र साकारताना दिसेल. तुम्हाला ठाऊक असेलच की, केवळ साऊथमध्येच नाही तर हिंदीतही ‘सूर्यवंशी’ नावाचा चित्रपट याआधी बनला आहे. या जुन्या ‘सूर्यवंशी’मध्ये सलमान खान लीड रोलमध्ये होता.
पर्सनल लाईफबाबत बोलायचे झाले तर कतरिना 16 जुलैला आपला 36वा वाढदिवस साजरा करणार आहे. कतरिना यावर्षी तिच्या बर्थडेला एक खास प्लान केला आहे. कतरिनाला यावर्षीचा तिचा बर्थडे मित्रांसोबत सेलिब्रेट करण्याची इच्छा आहे. आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत कॅट म्हणाली, काही दिवसांचा ब्रेक घेऊन मला बहिणीसोबत आणि मित्रांबरोबर बाहेर जायचे आहे. कुठल्यातरी चांगल्या ठिकाणी जाऊन मौज- मस्ती करण्याची इच्छा आहे. त्यामुळे एक गोष्ट नक्की होते की कतरिनाला हा बर्थ डे बॉलिवूडपासून दूर जाऊन सेलिब्रेट करायचा आहे.