कार्तिक आर्यनला किसिंग सीन देताना पाहून आईला रडू कोसळलं अन् आजी नाराज झाली तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 09:36 AM2022-11-22T09:36:15+5:302022-11-22T09:37:29+5:30

बॉलीवूड स्टार कार्तिक आर्यनच्या लोकप्रियतेमागे त्याच्या रोमँटिक अंदाजाचा खूप मोठा वाटा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

kartik aaryans mom cried after watching him kiss onscreen in pyaar ka punchnama naani got upset | कार्तिक आर्यनला किसिंग सीन देताना पाहून आईला रडू कोसळलं अन् आजी नाराज झाली तेव्हा...

कार्तिक आर्यनला किसिंग सीन देताना पाहून आईला रडू कोसळलं अन् आजी नाराज झाली तेव्हा...

googlenewsNext

बॉलीवूड स्टार कार्तिक आर्यनच्या लोकप्रियतेमागे त्याच्या रोमँटिक अंदाजाचा खूप मोठा वाटा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया-२ मध्येही अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत त्याचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला होता. या सिनेमात दोघांचा एक किसिंग सीन देखील पाहायला मिळाला होता. 

कार्तिक आर्यनला किसिंग सीन आणि रोमँटिक अंदाजात पाहणं चाहते देखील पसंत करतात. पण स्वत: कार्तिक आर्यनला ऑनस्क्रीन किसिंग सीन देणं काही सोपं नव्हतं. अर्थात कार्तिकनं त्याचा 'प्यार का पंचनामा' या पहिल्यावहिल्या सिनेमातही अभिनेत्री नुसरत भरुचा सोबत किसिंग सीन दिला होता. मग या सीनवर त्याच्या कुटुंबीयांनी जी प्रतिक्रिया दिली ते पाहून कार्तिक आता ऑनस्क्रीन किसिंग सीन देताना थोडा अस्वस्थ होतो.

किसिंग सीनपाहून आईला कोसळलं होतं रडू
'आकाशवाणी' सिनेमाच्या वेळी एका मुलाखतीत कार्तिक आर्यननं किसिंग सीनमागची एक वेगळीच कहाणी सांगितली होती. चित्रपटात मी किसिंग सीन देणं माझ्या आईला आवडत नाही त्यामुळे अशा सीनपासून मी कसं दूर राहता येईल याचा प्रयत्न करतो. आपण स्वत:ही किसिंग सीन देताना अस्वस्थ असतो असंही तो म्हणाला. "मी मुलगा आहे आणि कीस करणंही मला माहित आहे. पण ऑनस्क्रीन किसिंग सीन देणं माझ्यासाठी सहज सोपी गोष्ट नाही. 'प्यार का पंचनामा' सिनेमात लिपलॉक सीन होता आणि तो करण्यास मी दिग्दर्शकांना नकार दिला होता. मी ऑनस्क्रीन किस करू शकत नाही कारण माझी आई आणि आजीला ते आवडत नाही", असं कार्तिक आर्यननं एका मुलाखतीत सांगितलं. 

चित्रपटात माझा किसिंग सीन पाहून तर आईला रडूच कोसळलं होतं. तिला ते अजिबात आवडलं नव्हतं. एकतर तू शिक्षण सोडून अभिनेता बनलास आणि त्यातही तू हे असलं काम करतोस अशी तिची प्रतिक्रिया होती. आता पुढे मलाही किसिंग सीन द्यावासा वाटत नाही. पण दिग्दर्शकाचं म्हणणं ठाम होतं त्यामुळे मला किसिंग द्यावा लागतो, असंही कार्तिक म्हणाला. 

फेब्रुवारी २०२३ मध्ये आता कार्तिक आर्यन 'शहजादा' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तो अभिनेत्री क्रिती सनोन सोबत दिसणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत 'सत्य प्रेम की कथा' सिनेमात पाहायला मिळणार आहे. 

Web Title: kartik aaryans mom cried after watching him kiss onscreen in pyaar ka punchnama naani got upset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.