कार्तिक आर्यनला पुन्हा एकदा ‘जोर का झटका’, करण जोहर पाठोपाठ शाहरूखचाही ‘दे धक्का’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 16:23 IST2021-05-27T16:19:33+5:302021-05-27T16:23:39+5:30
कार्तिक आर्यनचे दिवस सध्या फार बरे नाहीत. तूर्तास तरी हेच वाटतेय. काही दिवसांपूर्वी करण जोहरने त्याची ‘दोस्ताना 2’मधून हकालपट्टी केली होती. आता...

कार्तिक आर्यनला पुन्हा एकदा ‘जोर का झटका’, करण जोहर पाठोपाठ शाहरूखचाही ‘दे धक्का’!!
कार्तिक आर्यनचे (Kartik Aaryan) दिवस सध्या फार बरे नाहीत. तूर्तास तरी हेच वाटतेय. काही दिवसांपूर्वी करण जोहरने ( Karan Johar) त्याची ‘दोस्ताना 2’मधून हकालपट्टी केली होती. आता काय तर शाहरूख खान (Shahrukh Khan)यानेही आपल्या एका सिनेमातून कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवल्याचे कळतेय. काही रचनात्मक मतभेदांमुळे कार्तिकनेच हा सिनेमा सोडल्याचेही म्हटले जातेय.
ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरूख खानच्या होम प्रॉडक्शनचा एक सिनेमा कार्तिकने साईन केला होता. या सिनेमाचे साइनिंग अमाऊंटही कार्तिकने घेतले होते. सगळे काही सुरळीत सुरू असताना मतभेद झालेत आणि या मतभेदांमुळे कार्तिकने म्हणे थेट सिनेमाच सोडला. साइनिंग अमाऊंटही त्याने परत केल्याचे कळते.
अद्याप या सिनेमाची घोषणा झाली नव्हती. पण यावर्षी त्याचे शूटींग सुरू होणार होते. अजय बहल दिग्दर्शित हा सिनेमा शाहरूखचे ‘रेड चिलीज प्रॉडक्शन’ प्रोड्यूस करणार होता. या सिनेमात कार्तिकच्या अपोझिट कतरिना कैफ दिसणार होती.
आता कार्तिक या सिनेमातून आऊट झाल्यावर त्याच्या जागी कोणता हिरो दिसतो, ते अद्याप गुलदस्त्यात आहे.
कार्तिक आर्यनकडे सध्या भुलभुलय्या 2 हा सिनेमा आहे. यात तो कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे. याशिवाय रोहित शेट्टीच्या एका सिनेमातही कार्तिकची वर्णी लागली आहे.
म्हणून ‘दोस्ताना2’मधून झाली होती हकालपट्टी?
कार्तिकला सिनेमातून काढल्यानंतर करण जोहर सोशल मीडियावर ट्रोल झाला होता. कालांतराने करणने असे का केले, याचे कारणही समोर आले होते. ईटी टाईम्सच्या रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यनला गेल्या वर्षी लॉकडाउनच्या आधी 2-3- कोटी रुपये मानधनावर ‘दोस्ताना 2’ या चित्रपटासाठी साइन केले होते. नंतर त्याची ब्रँड व्हॅल्यू वाढली आणि त्याने अधिक मानधनाची मागणी केली. कार्तिक आर्यनची ब्रँड व्हॅल्यू 10 कोटींवर गेली होती आणि त्यामुळे त्याने निर्मात्यांकडे ही मागणी केली होती. यावर करण जोहर अजिबात खूष नव्हता. याशिवाय कार्तिकच्या या अनप्रोफोशनल वागणुकीला घेऊन देखील तो नाराज होता. त्यामुळे त्याने थेट कार्तिकला चित्रपटातून बाहेर काढले. एवढेच नाही तर कार्तिक आर्यनला सोशल मीडियावर देखील अनफॉलो केले.