Shehzada Trailer : -तो डिस्कशन नहीं करते हैं ॲक्शन करते हैं..., 'शेहजादा'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 15:27 IST2023-01-12T15:16:53+5:302023-01-12T15:27:58+5:30
Kartik Aaryan : कार्तिक आर्यनच्या बहुप्रतिक्षीत 'शेहजादा' (Shehzada) या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि हा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Shehzada Trailer : -तो डिस्कशन नहीं करते हैं ॲक्शन करते हैं..., 'शेहजादा'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) बहुप्रतिक्षीत 'शेहजादा' (Shehzada) या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. कार्तिकच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर 'शेहजादा' चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे आणि हा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ट्रेलरची सुरुवात होते ती कार्तिकच्या धमाकेदार ॲक्शनने. "जब बात फॅमिली पर आए तो डिस्कशन नहीं करते हैं ॲक्शन करते हैं," या डायलॉगने ट्रेलर सुरू होतो. यानंतर कार्तिकच्या वडिलांच्या भूमिकेत परेश रावल दिसतात. क्रिती सॅनन व कार्तिकचा रोमान्सही पाहायला मिळतो. दोघांची केमिस्ट्री जबरदस्त आहे. एकूणच फुल ऑफ ॲक्शन, कॉमेडी, रोमान्स असं सगळं काही ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं.
कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जाणारा कार्तिक 'शेहजादा'मधून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहे. 'शहजादा'मध्ये कार्तिक आर्यनशिवायबॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन (Kriti Senon) आणि मनीषा कोईराला मुख्य भूमिकेत आहेत. 'शेहजादा' हा चित्रपट 10 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.