करिश्मा कपूरचा बॉलिवूडमधील पहिला क्रश कोण? बहीण करीना कपूर खानने घेतलं 'या' अभिनेत्याचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 13:56 IST2024-10-09T13:55:23+5:302024-10-09T13:56:24+5:30

मोठी बहीण करिश्माचा क्रश कोण होता याचा खुलासा धाकटी बहिण करीनाने केलाय. त्यामुळे करिश्माची अशी प्रतिक्रिया दिली (kareena kapoor, karishma kapoor)

Karisma Kapoor's crush in the bollywood industry Sister Kareena Kapoor Khan took the name of salman khan | करिश्मा कपूरचा बॉलिवूडमधील पहिला क्रश कोण? बहीण करीना कपूर खानने घेतलं 'या' अभिनेत्याचं नाव

करिश्मा कपूरचा बॉलिवूडमधील पहिला क्रश कोण? बहीण करीना कपूर खानने घेतलं 'या' अभिनेत्याचं नाव

करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर या बहिणींची जोडी मनोरंजन विश्वात चांगलीच चर्चेत आहे. दोघींनी आजवर विविध भूमिका करुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. करीना-करिश्मा या बहिणींची जोडी सध्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये सहभागी झाल्यात. यावेळी दोघींनी चांगलीच धमाल केलेली दिसली. दोघींनी एकमेकींबद्दल अनेक खुलासे केले. अशातच करीनाने केलेला एक खुलासा ऐकून करिश्माची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

बहिणीच्या बॉलिवूड क्रशबद्दल करीनाने केला खुलासा

'द कपिल शर्मा शो'मध्ये करीना-करिश्मा या दोन बहिणींची डॅशिंग एन्ट्री झाली. पहिल्यांदाच या दोघी 'द कपिल शर्मा शो' निमित्ताने एकत्र आल्या. त्यावेळी कपिल शर्माने एकमेकींबद्दलचे सीक्रेट प्रश्न वापरुन गुपितं जाणून घेतली. कपिलने करीनाला विचारलं की, बॉलिवूडमधील करिश्माचा पहिला क्रश कोण होता. हे ऐकताच क्षणाचाही वेळ न दवडता करीनाने सलमान खानचं नाव घेतलं. करीनाने सलमानचं नाव घेताच करिश्माने बहिणीकडे वेगळाच लूक दिला. करीनानेही ओठ दाताखाली चावत मजेशीर प्रतिक्रिया दिली. या दोघींचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.


करीना-करिश्माचं वर्कफ्रंट

'द कपिल शर्मा शो'मध्ये सहभागी झालेल्या करीना कपूर आणि करिश्मा कपूर या दोघी बहिणी गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. करिश्मा सध्या 'इंडिया बेस्ट डान्सर' या शोचं परीक्षण करतेय. याशिवाय करिश्माची भूमिका असलेल्या 'मर्डर मुबारक' सिनेमाला नेटफ्लिक्सवर चांगला प्रतिसाद  मिळाला. तर करीनाचा मल्टिस्टारर बिग बजेट 'सिंघम अगेन' सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. १ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Web Title: Karisma Kapoor's crush in the bollywood industry Sister Kareena Kapoor Khan took the name of salman khan