दिल तो पागल है... सिनेमाला 26 वर्ष पूर्ण, करिश्मा कपूरने केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 19:04 IST2023-10-30T18:38:55+5:302023-10-30T19:04:58+5:30

'दिल तो पागल है' या चित्रपटाने 30 ऑक्टोबरला म्हणजेच आज 26 वर्ष पूर्ण केली आहेत.

Karisma Kapoor made a special post on 26 years of Dil Toh Pagal Hai cinema | दिल तो पागल है... सिनेमाला 26 वर्ष पूर्ण, करिश्मा कपूरने केली खास पोस्ट

दिल तो पागल है... सिनेमाला 26 वर्ष पूर्ण, करिश्मा कपूरने केली खास पोस्ट

 बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, करिश्मा कपूर आणि माधुरी दीक्षित यांचा रोमँटिक चित्रपट 'दिल तो पागल है' ची जादू आजही कायम आहे. 1997 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 30 ऑक्टोबरला म्हणजेच आज 26 वर्ष पूर्ण केली आहेत. चित्रपटाला 26 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अभिनेत्री करिश्मा कपूरने सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाच्या काही खास आठवणी शेअर केल्या आहेत. 

करिश्मा कपूरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यावर चाहत्यांच्या आठवणीही ताज्या झाल्यात. या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केलाय. एका यूजरने लिहिले, 'हा करिश्मा कपूरचा चांगला चित्रपट आहे. तर दुसऱ्याने लिहिले, 'माझा आवडता चित्रपट'.

या चित्रपटाला 26 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल यशराज फिल्मतर्फे एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये व्हिडिओच्या बॅग्राउंडमध्ये दिल तो पागल हैं गामणे वाजत असून चित्रपटातील काही सीनची एक झलक दाखवली आहे. 26 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'दिल तो पागल है' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर भुरळ पाडली.

Web Title: Karisma Kapoor made a special post on 26 years of Dil Toh Pagal Hai cinema