करिश्मा कपूरने दिला जुन्या आठवणींना उजाळा, सलमान खानसोबतचे फोटो केले शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 18:33 IST2019-01-12T18:33:20+5:302019-01-12T18:33:49+5:30
अभिनेत्री करिश्मा कपूर सोशल मी़डियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावर ती फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो सध्या व्हायरल होत आहे.

करिश्मा कपूरने दिला जुन्या आठवणींना उजाळा, सलमान खानसोबतचे फोटो केले शेअर
अभिनेत्री करिश्मा कपूर सोशल मी़डियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावर ती फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो सध्या व्हायरल होत आहे. या फोटोत तिच्यासोबत अभिनेता सलमान खान आहे. खरेतर करिश्माने इंस्टाग्रामवर जुन्या आठवणींना उजाळा देत हा फोटो शेअर केला आहे.
‘बीवी नंबर १’, ‘दुल्हन हम लें जाऐंगे’, ‘हम साथ साथ है’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये सलमान आणि करिश्माने एकत्र काम केले आहे. त्याकाळी चाहत्यांमध्ये ही सर्वात लोकप्रिय जोडी ठरली होती. याच आठवणींना उजाळा देण्यासाठी करिष्माने हा फोटो शेअर केला असून सध्या हा फोटो चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.
शाहरुख खानचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या झिरो या चित्रपटामध्ये करिश्मा कॅमियो रोलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटाव्यतिरिक्त गेल्या अनेक वर्षात करिश्मा अन्य कोणत्याही चित्रपटात झळकलेली नाही. तर सलमान खानचा 'भारत' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटासाठी सध्या सलमान खान प्रचंड मेहनत घेतोय. प्रियांका चोप्रा बाहेर पडल्यानंतर सलमानची लकी चार्म कॅटरिना कैफही या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तब्बू, जॅकी श्रॉफ आणि दिशा पाटनी हे अन्य कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘भारत’मध्ये सलमान खान १० वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. सलमानचे चाहते या चित्रपटाची वाट उत्सुकतेने पाहत आहेत.