करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 10:51 IST2025-06-19T10:50:35+5:302025-06-19T10:51:15+5:30
Who is Samaira Kapur: समायरा कपूरविषयी जाणून घ्या.

करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
अभिनेत्री करिश्मा कपूरचे (Karisma Kapoor) पूर्व पती संजय कपूर (Sunjay Kapur) यांचं १२ जून रोजी लंडनमध्ये निधन झालं. पोलो खेळताना हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. संजय कपूर यांचं पार्थिव सात दिवसांनी भारतात आलं आहे. दिल्लीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. करिश्मा आणि तिची दोन्ही मुलं अंत्यसंस्कारासाठी दिल्लीत आहेत. तसंच संजय कपूरची यांचं कुटुंबही दिल्लीत पोहोचलं आहे. प्रार्थना सभेसाठी कोण कोण उपस्थित असतील यामध्ये करिश्मा आणि तिच्या दोन्ही मुलांची नावंही आहेत.
कोण आहे समायरा कपूर?
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी २००३ साली लग्नगाठ बांधली होती. २००५ साली करिष्माने मुलीला जन्म दिला. तिचं नाव समायरा कपूर (Samaira Kapur). समायरा २० वर्षांची झाली आहे. तिच्या लिंक्डइन प्रोफाईलमुसार, तिने अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे मधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. सध्या ती अमेरिकेच्या मॅशुएट्समध्ये टफ्ट्स युनिव्हर्सिटीतून पदवीचं शिक्षण घेत आहे. २०२७ मध्ये ती ग्रॅज्युएट होणार आहे.
समायरा कपूर लाईमलाईटपासून दूरच राहते. करिश्मासोबत अनेकदा ती कॅमेऱ्यासमोर आली आहे. मात्र ती फार सोशल होत नाही. तिचं इन्स्टाग्राम अकाऊंटही प्रायव्हेट आहे. समायरच्या लूक्समध्येही कमालीचा बदल झाल्याने ती मध्यंतरी चर्चेत आली होती.
समायरालाही एक छोटा भाऊही आहे. २०१० मध्ये करिष्माने मुलाला जन्म दिला होता. त्याचं नाव कियान आहे. तो आता १५ वर्षांचा आहे. करिश्मा एकटीच दोन्ही मुलांचा सांभाळ करते. संजय कपूर यांच्याकडून करिश्माला मुलांसाठी लाखो रुपये मिळत होते.