'जब वी मेट'मध्ये काम करण्यास करीनाने दिलेला नकार, पण या व्यक्तीने समजवल्यानंतर बनला बंपर हिट सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 16:45 IST2025-03-14T16:44:29+5:302025-03-14T16:45:20+5:30

Jab We Met Movie : बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट रोमँटिक चित्रपटांचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा त्यात 'जब वी मेट'चे नाव आवर्जुन घेतले जाते. प्रेक्षकांना हा चित्रपट खूपच आवडला होता.

Kareena refused to work in 'Jab We Met', but after this person convinced her, the film became a bumper hit | 'जब वी मेट'मध्ये काम करण्यास करीनाने दिलेला नकार, पण या व्यक्तीने समजवल्यानंतर बनला बंपर हिट सिनेमा

'जब वी मेट'मध्ये काम करण्यास करीनाने दिलेला नकार, पण या व्यक्तीने समजवल्यानंतर बनला बंपर हिट सिनेमा

बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट रोमँटिक चित्रपटांचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा त्यात 'जब वी मेट'(Jab We Met Movie)चे नाव आवर्जुन घेतले जाते. प्रेक्षकांना हा चित्रपट खूपच आवडला होता. या चित्रपटातून केवळ शाहीद आणि करीनाची जोडी हिट झाली नव्हती तर या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचीही प्रशंसा झाली. आजही प्रेक्षक या चित्रपट तितक्याच आवडीने पाहतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की करीनाला हा चित्रपट कधीच करायचा नव्हता. 

ऑक्टोबर २००७ साली रिलीज झालेला 'जब वी मेट' हा दिग्दर्शक इम्तियाज अलीचा दुसरा चित्रपट होता. या चित्रपटात फारशी ताकद नाही, असे अनेकांना वाटत असले, तरी प्रदर्शित झाल्यानंतर तो बंपर हिट ठरला. आजही या चित्रपटाचे चाहते त्याचे दमदार आणि मनोरंजक संवाद, अप्रतिम गाणी आणि प्रत्येक पात्राचा उत्कृष्ट अभिनय पाहून प्रभावित झाले आहेत. या चित्रपटातील शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि करीना कपूर (Kareena Kapoor)ची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

करीनाने नाकारलेला सिनेमा, पण...

विशेष म्हणजे जेव्हा करीना कपूरला निर्मात्यांकडून या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा तिने यात काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता. खरेतर, करीना कपूरला पडद्यावर काही खास व्यक्तिरेखा साकारायची होती. या वेगळ्या पात्राची वाट पाहण्यासाठी करीनाने दीड वर्षाचा ब्रेक घेतला होता. दिग्दर्शक इम्तियाज अलीचा हा फक्त दुसरा चित्रपट होता, त्यामुळे करीना कपूर साशंक होती. मात्र, याआधी इम्तियाजच्या 'सोचा ना था' या पहिल्या चित्रपटाचेही खूप कौतुक झाले होते.

या व्यक्तीने करीनाला केले सिनेमात काम करण्यास तयार

करीनाने या प्रोजेक्टला नकार दिल्यानंतर शाहिद कपूरने तिला या सिनेमात काम करण्यासाठी मनवले. खुद्द करीनाने एका मुलाखतीदरम्यान याचा उल्लेख केला होता. करीनाने सांगितले की, इम्तियाजने शाहिदला फोन करून चित्रपटाबद्दल सांगितले. मी इम्तियाजला ओळखत नव्हते. त्याचा पहिला चित्रपट सोचा ना था पाहिला नव्हता, मला वाटत नाही शाहिदने हा चित्रपट पाहिला असेल. हा चित्रपट इतका आयकॉनिक बनेल असे मला कधीच वाटले नव्हते.

शाहिद आणि करीना करत होते एकमेकांना डेट
खरेतर, या काळात शाहिद आणि करीना बराच काळ एकमेकांना डेट करत होते. यामुळे शाहिदने करीनाला त्याच्यासोबत चित्रपटात काम करण्यास करीनाला मनवले होते. मात्र, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहिद आणि करिना यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि नंतर दोघेही वेगळे झाले.


 

Web Title: Kareena refused to work in 'Jab We Met', but after this person convinced her, the film became a bumper hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.