Boycott Laal Singh Chaddhaच्या दरम्यान करीना कपूरचं विधान आलं चर्चेत, म्हणाली- 'मी बघणार नाही सिनेमा'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2022 06:53 PM2022-08-06T18:53:02+5:302022-08-06T18:54:30+5:30

Aamir Khan and Kareena Kapoor Khan's Upcoming Movie Laal Singh Chaddha : आमिर खान आणि करीना कपूर खानचा आगामी चित्रपट लाल सिंग चड्ढा ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Kareena Kapoor's statement came into discussion during Boycott Laal Singh Chaddha, she said- 'I will not watch the movie' | Boycott Laal Singh Chaddhaच्या दरम्यान करीना कपूरचं विधान आलं चर्चेत, म्हणाली- 'मी बघणार नाही सिनेमा'

Boycott Laal Singh Chaddhaच्या दरम्यान करीना कपूरचं विधान आलं चर्चेत, म्हणाली- 'मी बघणार नाही सिनेमा'

googlenewsNext

निर्माता करण जोहरचा चॅट शो 'कॉफी विथ करण सीझन ७' (Koffee With Karan 7) ७ जुलैपासून प्रसारित झाला. या शोमध्ये बॉलिवूड स्टार्सना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे करायचे आहेत. रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट (Alia Bhatt) या कॉफी शोचे पहिले पाहुणे होते. त्याच वेळी, या आठवड्यात आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) पाहुणे म्हणून आले होते. यादरम्यान करण जोहरने दोघांनाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले. शो दरम्यान करीना कपूरने तिच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) या चित्रपटाबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत.

सध्या 'लाल सिंह चड्ढा' खूप चर्चेत आहे. 'लालसिंग चड्ढा'ला खूप विरोध होतो आहे. त्याचवेळी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करीना आणि आमिर खान कॉफी विथ करण शोमध्ये पोहोचले होते. यादरम्यान करण जोहर म्हणाला की, मला वाटत नाही करीनाला चित्रपटाच्या यशाचा आणि अपयशाचा फरक पडत नाही. करीनाला यात काहीच इंटरेस्ट नाही. ती तिच्या जगात मस्त राहते. जर चित्रपट चांगला चालला तर चांगली गोष्ट नाही चालला तर काहीच हरकत नाही. करीना यावर काहीच बोलत नाही. यावर करीनाची बाजू आमिर खानने घेतली. आमिर खान म्हणाला की, करीना कपूर नेहमी तिच्या चित्रपटांबाबत चिंतेत असते. ती मला ओरडते की हे का नाही झाले, ते का झाले नाही. यावर करण जोहर म्हणाला की, कदाचित करीना कपूर तिचा लाल सिंग चड्ढा चित्रपट पाहेल.


यावर करीना कपूर म्हणते की, 'हो, मी माझे चित्रपट कधीही पाहत नाही'. यावर आमिर म्हणाला, 'तुम्ही अभिमानाने सांगत आहात ही इतकी आनंदाची गोष्ट नाही'. यावर करीना म्हणते, 'मीही चित्रपटाबद्दल नर्व्हस आहे. मला ते ४-५ महिन्यांनी बघायला आवडते.

आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी #BoycottLaalSinghCaddha सोशल मीडियावर ट्रेंड करत होता. आमिर खानचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे. त्याचवेळी प्रेक्षकांच्या या बहिष्काराच्या प्रतिक्रियेने आमिर खान खूप दुःखी झाला होता. लोकांच्या प्रतिक्रियांनंतर आमिर खानने लोकांना आपल्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नये अशी विनंती केली.

Web Title: Kareena Kapoor's statement came into discussion during Boycott Laal Singh Chaddha, she said- 'I will not watch the movie'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.