तैमूर आणि जेहला करिना कपूर शिकवते 'ही' महत्वाची गोष्ट, पोस्ट शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 15:18 IST2024-11-15T15:17:11+5:302024-11-15T15:18:00+5:30
करिनाला दोन गोंडस मुलं आहेत तैमूर आणि जेह.

तैमूर आणि जेहला करिना कपूर शिकवते 'ही' महत्वाची गोष्ट, पोस्ट शेअर करत म्हणाली...
Kareena Kapoor : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor) ही कायमच चर्चेत असते. तिचा एक वेगळाच स्वॅग असतो. फक्त करिनाचा नाही तर तिची मुलेही कायम चर्चेत असतात. करिनाला दोन गोंडस मुलं आहेत तैमूर आणि जेह. करिनाचं करिअरवर जसे लक्ष असते, तसेच तिचा आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्यावर भर असतो. त्यांना चांगल्या गोष्टी शिकवण्याचा तिचा प्रयत्न असतो.
करिना अनेकदा जेह आणि तैमूरसोबतच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतंच करिनाने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहलंय की "दिवसाच्या अंती मला आशा आहे की, माझ्या मुलांना मी प्रेम ही जगातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे शिकवण्यात यशस्वी ठरले असेल". यासोबत तिने 'गुड मॉर्निंग' लिहिले. दरम्यान, करिनाचा मुलगा तैमूर अली खानचा जन्म 2016 मध्ये झाला आणि दुसरा मुलगा जेहचा जन्म 2021 मध्ये झाला.
करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती अलिकडेच 'सिंघम अगेन'मध्ये झळकली. ज्यामध्ये तिने अवनीची भूमिका पुन्हा साकारली आहे. तर नेटफ्लिक्सवर तिचा 'द बर्किंगहम मर्डर' सिनेमा प्रदर्शित झआला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. तर याआधी तिचा नेटफ्लिक्सवर 'जाने जान' सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमाद्वारे तिने ओटीटीवर पदार्पण केलं होतं. हा सिनेमा मर्डर मिस्ट्रीवर आधारित होता.