विमातळाबाहेरची रांग तोडून थेट पुढे गेली करीना कपूर खान, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 10:02 IST2026-04-13T10:01:57+5:302026-04-13T10:02:24+5:30

करीना कपूर खानला व्हीआयपी ट्रीटमेंट?

Kareena Kapoor Khan skipped the queue outside the airport and went straight ahead netizens trolled her | विमातळाबाहेरची रांग तोडून थेट पुढे गेली करीना कपूर खान, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

विमातळाबाहेरची रांग तोडून थेट पुढे गेली करीना कपूर खान, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अभिनेत्री करीना कपूर खानचा बॉलिवूडमध्ये वेगळा स्वॅग आहे. कायम अॅटिट्यूडमध्ये राहणाऱ्या 'बेबो'चे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. कधी ती डोळे फिरवताना दिसते तर कधी वेगवेगळे एक्सप्रेशन देते. तरी करीनाच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. दरम्यान नुकतीच करीना विमानतळावर आली असता तिथे सिक्युरिटी चेकसाठी लोकांची रांग होती. मात्र करीना रांग तोडून थेट पुढे जाऊन उभी राहिली. तिचा व्हिडीओ आता व्हायरल होत असून तिला ट्रोल करण्यात येत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये करीना कपूर पीच रंगाच्या सलवार सूटमध्ये दिसत आहे. तिने डोळ्यावर डार्क गॉगल घातला आहे. कारमधून उतरत ती विमानतळावर दाखल झाली. तिथए सिक्युरिटी चेकवर लोकांची मोठा रांग होती. मात्र करीनासाठी रांग बाजूला केली गेली आणि तिला थेट पुढे सोडण्यात आलं. यावेळी रांगेतील लोक बघतच राहिले. सुरक्षारक्षकाने तिचा पासपोर्ट, आयडी तपासलं आणि तिला आत जाऊ दिलं. करीनाने नियम तोडल्यामुळे आता तिला ट्रोल केलं जात आहे.

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या अनेक कमेंट्स आल्या आहेत. 'सेलिब्रिटींना रांग तोडून पुढे जाण्याचा अधिकार कोणी दिला? इतर लोक रांगेत उभे राहून वाट पाहत आहेत जेव्हा की त्यांचीही अर्जंट फ्लाईट आहे. हे अजिबात बरोबर नाही'. तर आणखी एकाने लिहिले, 'भारतात व्हिआयपी आणि सामान्य लोक यांच्यातील भेदभाव वाढतच चालला आहे'. तर काही नेटकऱ्यांनी करीनाची बाजू घेतली आहे. 'सेलिब्रिटींना पाहून लोकांची उगाच गर्दी होण्याची शक्यता असते त्यापेक्षा त्यांना आधीच जाऊ दिलेलं चांगलं' अशी कमेंट एकाने केली आहे.

करीना कपूर खान लवकरच मेघना गुलजारच्या 'दायरा' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये ती पृथ्वीराज सुकुमारनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. सिनेमा कधी रिलीज होणार याबद्दल अजून माहिती समोर आलेली नाही.

Web Title : करीना कपूर खान एयरपोर्ट पर लाइन तोड़कर आगे बढ़ीं, नेटिज़न्स ने किया ट्रोल

Web Summary : करीना कपूर खान को एयरपोर्ट पर सिक्योरिटी लाइन तोड़ने के बाद आलोचना का सामना करना पड़ रहा है। वीडियो में दिख रहा है कि वह सीधे आगे बढ़ गईं। कुछ लोग उनकी सेलिब्रिटी स्थिति का बचाव कर रहे हैं, जबकि कई नेटिज़न्स वीआईपी ट्रीटमेंट पर सवाल उठा रहे हैं। वह जल्द ही 'दायरा' में दिखेंगी।

Web Title : Kareena Kapoor Khan Skips Airport Queue, Faces Netizen Backlash

Web Summary : Kareena Kapoor Khan is facing criticism after a video surfaced showing her bypassing the security queue at the airport. While some defend her celebrity status, many netizens are calling out the perceived VIP treatment and questioning the fairness of the situation. She will soon appear in 'Daira'.