VIDEO : हेच बाकी राहिलं होतं..., भररस्त्यात करिना कपूर व सैफ अली खानचा रोमान्स, पाहून भडकले फॅन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 15:51 IST2022-12-14T15:46:03+5:302022-12-14T15:51:14+5:30
Saif Ali Khan, Kareena Kapoor : होय, सैफ व करिना दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि व्हिडीओनंतर दोघंही जबरदस्त ट्रोल होत आहेत.

VIDEO : हेच बाकी राहिलं होतं..., भररस्त्यात करिना कपूर व सैफ अली खानचा रोमान्स, पाहून भडकले फॅन्स
सैफ अली खान (Saif Ali Khan) व करिना कपूर खान ( Kareena Kapoor ) हे बॉलिवूडचं लोकप्रिय जोडपं. या ना त्या कारणाने हे कपल सतत चर्चेत असतं. दोघं सोबत दिसले रे दिसले की कॅमेरे त्यांच्याकडे वळतात. हेच कपल सध्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. होय, दोघांचाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि हा व्हिडीओ पाहून दोघंही जबरदस्त ट्रोल होत आहेत.
सैफ व करिना दोघांही वांद्रेस्थित अपार्टमेंटबाहेर दिसले. यावेळी त्यांचा लाडका तैमूरही त्यांच्यासोबत होता. दोघंही फॉर्मल आऊटफिटमध्ये घराबाहेर निघाले. करिना फोनवर बिझी होती तर लाडका वडिलांच्या खांद्यावर उलटा लटकलेला तैमूर फोनवर गेम खेळण्यात बिझी होता. तिघंही घराबाहेर पडले. अचानक सैफ मागे वळला आणि त्याने करिनाला किस केलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि पाठोपाठ लोकांनी सैफिनाला ट्रोल करायला सुरूवात केली.
काहींनी याला ओव्हर अॅक्टिंगचं नाव दिलं तर काहींनी नौटंकी म्हणत सैफ व करिनाला ट्रोल केलं. घराच्या आत किस करायचं. इतकंही मॉडर्न व्हायची गरज नाही, अशी कमेंट एका युजरने केली. तर मीडियाचं अटेंशन मिळवण्यासाठी हे लोक काहीही करतात, अशी कमेंट एका युजरने केली.
दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सैफ सध्या ‘आदिपुरूष’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो रावणाची भूमिका साकारताना दिसणार आहे. करिना कपूरबद्दल सांगायचं तर ती सध्या चित्रपटांपासून दूर आहे. ‘लालसिंग चड्ढा’ या सिनेमात ती अखेरची दिसली होती. अद्याप तरी करिनाने कुठलाही नवा प्रोजेक्ट साईन केलेला नाही.