करिना कपूरने साईज झीरो फिगरवर केलं भाष्य, म्हणाली, 'दीड वर्ष लागलं पण...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 14:15 IST2024-03-27T14:14:08+5:302024-03-27T14:15:05+5:30

करीना कपूर अशी अभिनेत्री आहे जिच्यामुळे 'झीरो साईज फिगर' ही टर्म प्रसिद्ध झाली होती. 'टशन' या सिनेमासाठी तिने हे केलं होतं.

Kareena Kapoor comments on size zero figure says It took a year and a half to achieve it | करिना कपूरने साईज झीरो फिगरवर केलं भाष्य, म्हणाली, 'दीड वर्ष लागलं पण...'

करिना कपूरने साईज झीरो फिगरवर केलं भाष्य, म्हणाली, 'दीड वर्ष लागलं पण...'

बॉलिवूडची 'बेबो' म्हणून ओळख असलेली अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आगामी 'द क्रू' (The Crew) सिनेमामुळे चर्चेत आहे. करिनाचं करिअर वयाच्या चाळीशीतही सुपरफास्ट आहे. लग्न, दोन मुलांचा जन्म या वैयक्तिक आयुष्यातील महत्वाच्या बदलांनंतरही तिच्या करिअरमध्ये कोणताच अडथळा आला नाही. करीना कपूर अशी अभिनेत्री आहे जिच्यामुळे 'झीरो साईज फिगर' ही टर्म प्रसिद्ध झाली होती. 'टशन' या सिनेमासाठी तिने हे केलं होतं. आता पुन्हा तिने या विषयावर भाष्य केलं आहे.

2008 साली आलेला विजय कृष्णा आचार्या दिग्दर्शित 'टशन' हा सिनेमा बॉक्सऑफिसवर  जोरदार आपटला. पण करीना कपूरच्या साईज झीरो फिगरमुळेच जास्त चर्चेत आला होता. दरम्यान आता रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये करीना कपूरने साईज झिरोवर चर्चा केली. ती म्हणाली, "सिनेमाची मागणी होती म्हणून मी साईज झीरो फिगर केली होती. यावर खूप चर्चा झाली. लोकांना वाटलं याचा माझ्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होईल. पण असं अजिबात झालं नाही. मी अशी व्यक्ती आहे जी प्रत्येक काम आनंदाने करते."

ती पुढे म्हणाली, "दीड वर्ष मेहनत केल्यानंतर मी स्वत:ला साईज झीरोमध्ये आणलं. पण आता जर मला कोणत्या अॅक्शन सिनेमात घेतलं तर त्यासाठी मला वजन घटवण्याची गरज नाही. पुन्हा साईज झीरो करणार नाही."

'टशन' सिनेमात करीना कपूरने अक्षय कुमार, सैफ अली खान आणि अनिल कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती. मल्टिस्टारर अॅक्शनपट असलेला हा सिनेमा चांगलाच फ्लॉप झाला होता.

करीना कपूरच्या 'द क्रू' मध्ये तब्बू आणि क्रिती सेनन यांचीही मुख्य भूमिका आहे. तिघीही यामध्ये एअर हॉस्टेस आहेत. मिस्ट्री जॉनरचा हा सिनेमा असणार आहे. 

Web Title: Kareena Kapoor comments on size zero figure says It took a year and a half to achieve it