ज्यादा पी ली क्या?  पार्टीनंतरचा करिना व अमृताचा VIDEO व्हायरल, लोकांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 14:45 IST2022-05-06T14:41:05+5:302022-05-06T14:45:34+5:30

Karisma Kapoor Party : गेल्या रात्री करिश्मा कपूरनं तिच्या घरी डिनर पार्टी ठेवली आणि करिना आपल्या गर्ल गँगसोबत तिथं पोहोचली. पार्टी संपली आणि घरी परतत असतानाचा बेबोचा व्हिडीओ व्हायरल झाला. मग काय, बेबो ट्रोल झाली.

kareena kapoor Amrita Arora brutally trolled after leaving karisma kapoor party | ज्यादा पी ली क्या?  पार्टीनंतरचा करिना व अमृताचा VIDEO व्हायरल, लोकांनी केलं ट्रोल

ज्यादा पी ली क्या?  पार्टीनंतरचा करिना व अमृताचा VIDEO व्हायरल, लोकांनी केलं ट्रोल

Karisma Kapoor Party : बॉलिवूडची बेबो करिना कपूर (Kareena Kapoor) सतत तिच्या गर्ल गँगसोबत पार्टी करताना दिसते. बेबोला पार्टीसाठी कुठलंही निमित्त लागत नाही. गेल्या वर्षी पार्टीच्या नादात बेबो कोरोना पॉझिटीव्ह झाली होती. गेल्या रात्रीही अशीच पार्टी रंगली. करिश्मा कपूरनं तिच्या घरी डिनर पार्टी ठेवली आणि करिना आपल्या गर्ल गँगसोबत तिथं पोहोचली. करण जोहर, मनीष मल्होत्रा, संजय कपूरही या पार्टीत हजर होते. पार्टी संपली आणि घरी परतत असतानाचा बेबोचा व्हिडीओ व्हायरल झाला. मग काय, बेबो ट्रोल झाली. तिच्यासोबत अमृता अरोरा ( Amrita Arora) हिलाही लोकांनी ट्रोल केलं.

बॉलिवूड सेलिब्रिटी कधीच पार्टी मिस करत नाहीत. करिना, करिश्मा, मलायका आणि अमृता या चौघी तर पार्टी म्हटलं की एका पायावर तयार असतात. काल करिश्मानं डिनर पार्टीत सगळ्याच एकत्र आल्यात. करिना या पार्टीत मल्टी कलर कफ्तान वन पीस घालून दिसली. पार्टी धम्माल रंगली. रात्री उशीरा पार्टी संपल्यावर करिना व अमृता घरी जायला निघाल्या. यावेळी पापाराझींनी त्यांचे फोटो क्लिक करण्याचा प्रयत्न केला असता दोघीही चेहरा लपवताना दिसल्या. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने या दोघींचा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्या.


करिना व अमृताला गाडीत बघून लोकांनी दोघींना ट्रोल केलं. ज्यादा पी ली क्या? असं काहींनी विचारलं तर ‘पिया... पिया रे...,’ असं लिहित करिना व अमृताची मजा घेतली. या इतक्या पार्ट्या करूनही इतक्या फिट कशा राहतात, असा प्रश्न काहींना पडला. देशात मेकअपचं सामान बॅन व्हायला हवं. तेव्हाच खरे चेहरे समोर येतील, अशी कमेंट एकानं केली. काही युजर्सनी मात्र, त्यांना त्यांचं पर्सनल लाईफ एन्जॉय करू द्या, म्हणत बेबो व अमृताचा बचाव केला.

Web Title: kareena kapoor Amrita Arora brutally trolled after leaving karisma kapoor party