करणच्या ‘कॉफी’चा आस्वाद घ्यायला येणार त्याचे नवे स्टुडण्ट्स, रुपेरी पडद्याआधी दिसणार पहिली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 21:00 IST2019-02-11T21:00:00+5:302019-02-11T21:00:00+5:30
करणचे नवीन स्टुडण्ट्स गेल्या काही महिन्यांपासून स्टुडण्ट्स ऑफ द इयर-२ या चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत. स्टुडण्ट्स ऑफ द इयर या चित्रपटातून करणने आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना रुपेरी पडद्यावर लॉन्च केलं होतं.

करणच्या ‘कॉफी’चा आस्वाद घ्यायला येणार त्याचे नवे स्टुडण्ट्स, रुपेरी पडद्याआधी दिसणार पहिली झलक
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि चर्चित शो म्हणजे 'कॉफी विथ करण'. या शोमध्ये चित्रपटसृष्टीत दिग्गज सेलिब्रिटी मंडळी हजेरी लावतात. लवकरच या शोमध्ये करणचे नवीन स्टुडण्ट्स हजेरी लावणार आहेत. करणचे नवीन स्टुडण्ट्स म्हणजे टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया. हे सर्वजण करणच्या आगामी स्टुडण्ट्स ऑफ द इयर-२ या चित्रपटात झळकणार आहेत. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी हे तिघेही कॉफी विद करण या शोच्या मंचावर एकत्र दिसणार आहेत. अनन्या आणि ताराच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती समोर आली आहे. या दोघींनी करण आणि टायगरसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि करणसह कॉफीचा आस्वाद घेणार असल्याची माहिती आपल्या फॅन्सना दिली.
या फोटोत ताराने गोल्डन ड्रेस आणि अनन्याने निळा ड्रेस परिधान केला असून यांत दोघींचं सौंदर्य खुलून गेल्याचे दिसत आहे. सुटाबुटात करण आणि टायगरचा लूकही तितकाच खास आहे. करणचे नवीन स्टुडण्ट्स गेल्या काही महिन्यांपासून स्टुडण्ट्स ऑफ द इयर-२ या चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत. स्टुडण्ट्स ऑफ द इयर या चित्रपटातून करणने आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना रुपेरी पडद्यावर लॉन्च केलं होतं.
त्यामुळे स्टुडण्ट्स ऑफ द इयर-२मधून करणचे नवीन स्टुडण्ट्स रसिकांना भेटायला येणार कळल्यापासून रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे आलिया, वरुण आणि सिद्धार्थप्रमाणे टायगर, तारा आणि अनन्या यांना रसिक डोक्यावर घेणार का हे पाहणं रंजक ठरेल. स्टुडण्ट्स ऑफ द इयर-२ हा चित्रपट १० मे २०१९ रोजी रसिकांच्या भेटीला येईल.