करण जोहरच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये वरुण धवनसोबत दिसणार 'ही' अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 11:01 IST2018-09-26T10:53:36+5:302018-09-26T11:01:26+5:30
करण जोहरच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट 'रणभूमी' मध्ये वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र यात अभिनेत्री कोण असणार हे अजून नश्चित झालेले नव्हते.

करण जोहरच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये वरुण धवनसोबत दिसणार 'ही' अभिनेत्री
करण जोहरच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट 'रणभूमी' मध्ये वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र यात अभिनेत्री कोण असणार हे अजून नश्चित झालेले नव्हते. मात्र आता यावरुन पडद्या उचलला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यात वरुणच्या अपोझिट जान्हवी कपूरला कास्ट करण्यात येऊ शकते. वरुण आणि शशांक खेतान यांने याआधी 'हम्पटी शर्मा की दुल्हनियां' आणि 'ब्रदीनाथ की दुल्हनियां' सिनेमात एकत्र काम केले आहे. दोन्ही सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट गेले होते.
शशांक खेतानच्या डोक्यात आलिया भट्ट आणि जान्हवी कपूरचे नाव सुरु आहे. शशांकने याआधी दोघींच्या ही सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.आलिया सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये बिझी आहे. त्यामुळे यात जान्हवीला कास्ट करण्याची जास्त शक्यता आहे. रणभूमी 2020 च्या दिवाळीत रिलीज होण्याची शक्यता आहे. जान्हवी याशिवाय करण जोहरचा मल्टीस्टारर तख्तमध्ये दिसणार आहे. जान्हवी रणवीर सिंगच्या प्रेयसीची तर करीना त्याच्या बहिणीच्या भूमिकेत असेल. आलिया भट्ट विकी कौशलच्या पत्नीची भूमिका वठवणार. जोडी जमणार आहे. ‘तख्त’ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल. राजसिंहासनावरचे प्रेम आणि ते मिळवण्यासाठीची वाट्टेल त्या स्तराला जाण्याचे मनसुबे असे याचे कथानक असेल. शहाजहान आणि मुमताज यांच्या दोन मुलांच्या अर्थात दोन भावंडांमधील सिंहासनासाठीच्या वादाची कथा यात दिसेल. रणवीर सिंग, करीना कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर, विकी कौशल आणि भूमी पेडणेकर असे तगडे कलाकार आपले अभिनय कौशल्य पणाला लावताना दिसतील.