जान्हवी कपूरनंतर शनाया कपूरला लॉन्च करणार करण जोहर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 13:49 IST2018-12-06T13:48:00+5:302018-12-06T13:49:56+5:30
करण जोहरने बॉलिवूडमध्ये अनेक नवे चेहरे लॉन्च केले. आलिया भट्ट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर, ईशान खट्टर असे अनेक़ लवकरच करण तारा सुतारिया आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे यांना लॉन्च करणार आहे. यानंतर पुढचा नंबर आहे तो, अभिनेता संजय कपूर व महीप कपूरची मुलगी शनाया कपूर हिचा.

जान्हवी कपूरनंतर शनाया कपूरला लॉन्च करणार करण जोहर!!
करण जोहरने बॉलिवूडमध्ये अनेक नवे चेहरे लॉन्च केले. आलिया भट्ट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर, ईशान खट्टर असे अनेक़ लवकरच करण तारा सुतारिया आणि चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे यांना लॉन्च करणार आहे. यानंतर पुढचा नंबर आहे तो, अभिनेता संजय कपूर व महीप कपूरची मुलगी शनाया कपूर हिचा.
होय, नव्या वर्षात करण जोहर शनायाला लॉन्च करणार असल्याची खबर आहे. अलीकडे शनाया मुंबई अंधेरीतील करण जोहरच्या कार्यालयाबाहेर दिसली. यानंतर करणचे धर्मा प्रॉडक्शन शनायाला लॉन्च करणार असल्याच्या बातम्यांनी जोर धरला. प्राप्त माहितीनुसार,‘तख्त’ या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाल्यावर शनायाच्या चित्रपटाचे शूटींग सुरू होणार आहे.
खरे तर अनेक दिवसांपासून शनायाच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या येत आहेत. पण शनाया अलीकडे १९ वर्षांची झाली. त्यामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी ती आता सज्ज असल्याचे मानले जात आहे. एकंदर काय तर कपूर घराण्याची आणखी एक मुलगी बॉलिवूडसाठी सज्ज आहे.
चुलत बहीण जान्हवी कपूर आणि खास मैत्रिण अनन्या पांडे यांच्याप्रमाणेच शनायाचाही डेब्यू ग्रॅण्ड असणार आहे, हे सांगणे नकोच.
संजय कपूर आणि महीप या दाम्पत्याला शनाया आणि जहान नावाची दोन मुले आहेत. शनायाला नेहमीच सुहाना खान आणि अनन्या पांडेसोबत बघण्यात आले आहे. तिघीही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. शनाया सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे.