फॉलोअर्स कमी होताच करण जोहरनेही अनेकांना केलं अनफॉलो, ट्विटरवर फक्त चौघांनाच करतोय फॉलो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 20:35 IST2020-06-17T20:19:44+5:302020-06-17T20:35:36+5:30
करण जोहरने देखील अनेक लोकांना ट्विटरवर अनफॉलो केले आहे.

फॉलोअर्स कमी होताच करण जोहरनेही अनेकांना केलं अनफॉलो, ट्विटरवर फक्त चौघांनाच करतोय फॉलो
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येने बॉलिवूडमधील वातावरण ढवळून निघाले आहे. सुशांत बॉलिवूडमधील नेपोटिझमचा बळी ठरला. या पार्श्वभूमीवर कंगना राणौतने थेटपणे करण जोहरवर आरोप केले होते. सुशांत सिंग राजपूत जगातून गेला पण जातांना अनेक प्रश्न मागे सोडून गेला. बिहारच्या न्यायालयामध्ये एका वकीलाने . दिग्दर्शक करण जोहर, संजय लीला भन्साळी, एकता कपूर आणि अभिनेता सलमान खान यांच्यासह ८ जणांविरोधात मुझफ्फरपूरच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. या सर्वांवर सुशांत सिंगला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी आयपीसी 306, 109, 504 आणि 506 कलमांन्वये तक्रार दाखल करण्यात आल्याचे ओझा यांनी सांगितले.
‘बॉयकॉट करण जोहर’चा हॅशटॅग ट्रेंड होतोय. अनेकांनी करण जोहर व त्याच्या गँगवर तोंडसुख घेतले आहे. परिणामी करण जोहरचा सोशल मीडियावरच्या लोकप्रियतेचा ग्राफ वेगाने खाली आलेला दिसतोय.करण जोहरचे 10 लाख इन्स्टा फॉलोअर्स कमी झाले आहेत. करण जोहर व त्याच्या गँगने सुशांत सारख्या अनेकांना बॉलिवूडमध्ये मोठे होऊ दिले नाही.
आता करण जोहरने देखील अनेक लोकांना ट्विटरवर अनफॉलो केले आहे. करण जोहर आता फक्त आठ लोकांना ट्विटरवर अकाउंटवर फॉलो करत आहे. या आठ पैकी चारजण धर्मा प्रॉडक्शनचे अधिकारी आणि CEO अपूर्वा मेहताचा समावेश आहे. तर इतर चारजण अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि अक्षय कुमार आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे.