अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात मुलांनी करिअर करावं अशी करण जौहरची इच्छा, कारण वाचून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 13:21 IST2025-10-05T12:56:58+5:302025-10-05T13:21:12+5:30
स्टारकिड्स लॉन्च करणारा करण जोहर आपल्या मुलांना नाही बनवणार अभिनेता, जाणून घ्या कारण

अभिनय नाही तर 'या' क्षेत्रात मुलांनी करिअर करावं अशी करण जौहरची इच्छा, कारण वाचून थक्क व्हाल!
करण जोहरने अनेक स्टार किड्सना बॉलिवूडमध्ये लॉन्च केले आहे, जसे की आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा. तो नेहमीच 'स्टार किड्स'ना (बॉलिवूड कलाकार मुलांचे) लॉन्च करण्याच्या भूमिकेमुळे चर्चेत असतो आणि या कारणाने त्याला 'नेपोटिझम'चा टॅग देखील मिळाला आहे. पण, त्याच्या स्वत:च्या मुलांनी अभिनय क्षेत्रात येऊ नये, अशी करण जोहरची इच्छा आहे.
करणने नुकतंच युट्यूब चॅनल 'गेम चेंजर्स'वर कोमल नाहटाशी संवाद साधला. यावेळी त्याने मुलांच्या करिअरवर भाष्य केलं. करण जोहरला एक मुलगा व एक मुलगी आहे. रूही आणि यश असं करणच्या मुलांचं नाव आहे. करणला त्यांना अभिनेता बनवायचे नाही. मुलांच्या भविष्यातील करिअरबद्दल बोलताना करणने आपले मत अगदी स्पष्टपणे मांडले. तो म्हणाला, "मला त्यांनी मेकअप किंवा हेअर आर्टिस्ट बनवायचे आहे. कारण ते इतरांपेक्षा जास्त कमाई करत आहेत. एक केस बनवणे आणि दुसरा मेकअप करणे दोघांसाठीही खूप फायदेशीर ठरेल".
करण अविवाहित आहे आणि सात वर्षांपूर्वी सरोगसीद्वारे जुळ्यांचा बाबा झाला. करण व त्याची आई हिरू जोहर दोघेही या मुलांचा मोठ्या आनंदाने सांभाळ करतात. करण जोहरने नेहमीच आपल्या मुलांसोबतचे मजेदार व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.