'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:18 IST2025-12-30T11:17:31+5:302025-12-30T11:18:16+5:30

अनुपमा चोप्राच्या बुक लाँचवेळी करण जोहरने 'धुरंधर' सिनेमावर उधळली स्तुतीसुमनं

karan johar praises dhurandhar movie questions on his own craft says how its limited talks about aditya dhar | 'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया

'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाच्या यशामुळे बॉलिवूडमधील इतर स्पर्धक हादरलेच आहेत. आदित्य धरने स्पाय सिनेमाची अश लेव्हल सेट केली आहे ज्याच्याशी आता करण जोहर, वायआरएफ यांसारख्या फिल्ममेकर्सना स्पर्धा करायची आहे. 'धुरंधर' सिनेमा पाहून सोशल मीडियावर अनेकांनी वायआरएफच्या स्पाय युनिव्हर्सची अक्षरश: खिल्ली उडवली. करण जोहरने तर याआधीच सिनेमाचं कौतुक केलं होतं. पण आता त्याने पुन्हा सिनेमावर प्रतिक्रिया देताना स्वत:च्याच क्षमतेवर संशय घेतला आहे.

अनुपमा चोप्राच्या बुक लाँचवेळी दिलेल्या मुलाखतीत करण जोहर म्हणाला, "मला धुरंधर खूप आवडला...प्रचंड आवडला. मी सिनेमाचा क्राफ्ट, त्यातील म्युझिक पाहून हैराणच झालोय. कलाकारांच्या परफॉर्मन्सने मी 'धुरंधर'च्या जगात हरवून गेलो. मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा मी अक्षरश: रडत होतो. सैयारा पाहूनही माझं हेच झालं होतं. मला असं वाटलं की मला काहीतरी होतंय. मला वाटतं की पुरुषही मेनोपॉजमधून जातात. मी भावनिकरित्या मेनोपॉजमध्ये आहे. अशी लव्हस्टोरी पाहून मी स्वत:ला त्याच्याशी कनेक्ट केलं होतं."

तो पुढे म्हणाला, "मग ५ डिसेंबरला धुरंधर आला आणि मी उडालोच. असं वाटलं की याच्या तुलनेत माझा क्राफ्ट किती मर्यादित आहे. काय बॅकग्राऊंड म्युझिक आहे यार...इतरांना 'धुरंधर'बद्दल काय वाटतं ते त्यांचं मत आहे आणि मी त्याचा आदरही करतो. पण मला सिनेमाबद्दल एक गोष्ट आवडली ती म्हणजे दिग्दर्शक कुठेही शो ऑफ करायला जात नव्हता. त्याला त्याच्या क्षमतांची पूर्ण जाणीव होती. तो त्याचं क्राफ्ट दाखवत होता. तो कुठेही खूप भारी फ्रेम दाखवायला किंवा जास्तीचं काही दाखवायला जात नव्हता. खूप सुंदररित्या त्याने तो चित्रीत केला. ते पाहून मी माझ्याच क्षमतांवर प्रश्न उपस्थित केले होते आणि ही फिल्ममेकर म्हणून सकारात्मकच गोष्ट आहे. त्यामुळे यावर्षी सैयारा, धुरंधर तसंच 'लोका'ही मला खूप आवडला."

Web Title : 'धुरंधर' देखकर करण जौहर को अपनी क्षमताओं पर संदेह हुआ।

Web Summary : करण जौहर आदित्य धर की 'धुरंधर' से प्रभावित हुए, उन्होंने स्वीकार किया कि इसने उन्हें अपनी फिल्म निर्माण क्षमताओं पर सवाल उठाने पर मजबूर कर दिया। उन्होंने फिल्म के शिल्प, संगीत और प्रदर्शन की प्रशंसा की और निर्देशक के आत्मविश्वास और कहानी कहने में संयम की सराहना की। 'धुरंधर' ने उन्हें अपनी क्षमता का पुनर्मूल्यांकन करने के लिए प्रेरित किया।

Web Title : Karan Johar questions his abilities after watching 'Dhurandhar'.

Web Summary : Karan Johar was impressed by Aditya Dhar's 'Dhurandhar,' admitting it made him question his own filmmaking skills. He praised the film's craft, music, and performances, appreciating the director's confidence and restraint in storytelling. 'Dhurandhar' inspired him to re-evaluate his potential.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.