Student Of The Year 3: ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’मध्ये दिसणार विकी कौशल? करण जोहरने दिली ऑफर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 06:22 PM2022-11-16T18:22:18+5:302022-11-16T18:28:20+5:30

करण जोहरने  (Karan Johar) अभिनेता विकी कौशल सोबतचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ पाहून फॅन्स क्रेझी झाले आहेत.

karan johar offers vicky kaushal student of the year 3 during govinda naam mera promoti | Student Of The Year 3: ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’मध्ये दिसणार विकी कौशल? करण जोहरने दिली ऑफर?

Student Of The Year 3: ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’मध्ये दिसणार विकी कौशल? करण जोहरने दिली ऑफर?

googlenewsNext

विकी कौशलने (Vicky Kaushal) फार कमी वेळात बॉलिवूडमध्ये आपली एक खास ओळख निर्माण केली. त्याने मोजकेच सिनेमे केलेत, पण त्याच्या या सिनेमांनी चाहत्यांवर जादू केली. सध्या विकीकडे  अनेक मोठे सिनेमे आहेत. एकीकडे तो मेघना गुलजारसोबत ‘सॅम बहादूर’चं शूटींग करतोय, दुसरीकडे ‘गोविंदा नाम मेरा’ (Govinda Naam Mera) हा त्याचा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. अशात करण जोहरने  (Karan Johar) त्याच्या इंस्टाग्रामवर अभिनेता विकी कौशलसोबतचा एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे आणि हा व्हिडीओ पाहून फॅन्स क्रेझी झाले आहेत. कारण काय तर ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’. होय, करणने या व्हिडीओत ‘स्टुडंट ऑफ द ईअर3’ची  (Student Of The Year 3) हिंट दिली आहे.

या व्हिडिओमध्ये करण विकीच्या याच ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाविषयी बोलताना दिसत आहे. करण विकीला ‘गोविंदा नाम मेरा’ची संपूर्ण कथा सांगतो. पण ही संपूर्ण कथा ऐकल्यानंतर विकी करणचा चित्रपट करण्यास नकार देतो आणि यासाठी वेगवेगळे बहाणे करतो. पण विकीचे हे बहाणे ऐकून करण चिडतो. करणला रागावलेला पाहून विकी त्याची समजूत काढताना दिसतो. , ‘बघ, करण.. मला तुझ्या चित्रपटात काम करायचं आहे आणि यासाठी मी खूप उत्सुक आहे. धर्मासोबत काम करणं स्वप्न साकार झाल्यासारखं आहे. पण याशिवाय दुसरी एखादी कथा नाहीये का?’, असं विकी करणला विचारतो. यावर, ओह, तुला काय हवं, ते मला समजलं. आहे, एक स्टोरी आहे. इट्स बिग....असं करण म्हणतो. यावर काय? असं उत्सुकतेपोटी विकी विचारतो. यावर करण ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’चं नाव घेतो. हा सिनेमा करायचा नसेल तर तू ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’ करू शकतोस, असं करण म्हणतो. करणची ही ऑफर ऐकून विकीला धक्का बसतो.
हा व्हिडीओ ‘गोविंदा नाम मेरा’साठी केलेला पब्लिसिटी स्टंट असला तरी, यात ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’चा उल्लेख ऐकून चाहते क्रेझी झाले आहेत.  अर्थात करणला खरंच विकीसोबत ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’ करायचा आहे की हा नुसता एक पब्लिसिटी स्टंट आहे  हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

2012 मध्ये आलेला करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ हा चित्रपट हिट झाला  होता. आलिया भट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन यांनी चित्रपटाच्या पहिल्या भागातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचा दुसरा भाग 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. दुसऱ्या पार्टमध्ये  अनन्या पांडे, आदित्य सील आणि तारा सुतारिया यांनी टायगर श्रॉफसोबत   पदार्पण केलं होतं.  

Web Title: karan johar offers vicky kaushal student of the year 3 during govinda naam mera promoti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.