करण जोहरचे हे रूप पाहून वरुण त्याला म्हणाला, बाँड व्हिलन, केस न रंगवल्याने करण दिसतोय असा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 16:52 IST2020-04-25T16:51:31+5:302020-04-25T16:52:34+5:30
सध्या सगळे पार्लर, सलून बंद असल्याने सेलिब्रेटींची देखील पंचाईत होत आहे. या सगळ्यात करण जोहरचा एक वेगळा लूक समोर आला आहे.

करण जोहरचे हे रूप पाहून वरुण त्याला म्हणाला, बाँड व्हिलन, केस न रंगवल्याने करण दिसतोय असा
सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. सध्या सगळेच सेलिब्रेटी आपापल्या घरात असून सोशल मीडियावर सक्रिय आहेत.
सेलिब्रेटी घरात राहून आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. सध्या सगळे पार्लर, सलून बंद असल्याने सेलिब्रेटींची देखील पंचाईत होत आहे. या सगळ्यात काही सेलिब्रेटी एका वेगळ्याच रूपात दिसत आहे. आता करण जोहरचा नवा लूक वरुण धवनने सोशल मीडियावर शेअर केला आहे. वरुण धवनचा नुकताच वाढदिवस झाला. सध्या लॉकडाऊन असल्याने वरुणला त्याचा वाढदिवस घरातच साजरा करावा लागला. त्याच्या वाढदिवसाला सोशल मीडियावरून त्याच्या मित्रमैत्रिणींनी त्याला शुभेच्छा दिल्या. करणने वरुणला वाढदिवसाच्या दिवशी व्हिडिओ कॉल केला होता. करणने सध्या केस न रंगवल्यामुळे तो खूपच वेगळा दिसत आहे. वरुणने त्याचा हा लुूक पाहून ते तू बाँड व्हिलन दिसत असल्याचे त्याला म्हटले.
या व्हिडिओ चॅटमध्ये तू केसांना रंग का लावला नाहीस असे वरुणने करणला विचारले असता करण म्हणाला, तशी ही माझी मुलं यश आणि रुही मी म्हातारा झालो आहे असे मला म्हणतात. त्यामुळे मी ग्रे केसांमध्येच राहायचे असे ठरवले आहे. मी सध्या केवळ माझी आई आणि मुलांसोबत घरी आहे. त्यामुळे मी कसा दिसतोय हे इतरांना दाखवायची गरज नाहीये. सध्या माझ्या केसांना केमिकलपासून ब्रेक दिला आहे.