VIDEO : हे तर धर्मा शॉपिंग सेंटर...! Karan Joharचा वॉर्डरोब पाहून थक्क व्हाल...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 17:49 IST2022-05-25T17:47:45+5:302022-05-25T17:49:59+5:30
Karan Johar wardrobe : करण त्याच्या सिनेमांसाठी ओळखला जातो, तसाच त्याच्या पार्ट्या व स्टायलिश कपड्यांसाठीही ओळखला जातो. करणकडे किती कपडे असावेत? तर खोलीभर.

VIDEO : हे तर धर्मा शॉपिंग सेंटर...! Karan Joharचा वॉर्डरोब पाहून थक्क व्हाल...!!
बॉलिवूडचा लोकप्रिय निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करतोय. साहजिकच करणवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. करण त्याच्या सिनेमांसाठी ओळखला जातो, तसाच त्याच्या पार्ट्या व स्टायलिश कपड्यांसाठीही ओळखला जातो. करणकडे किती कपडे असावेत? तर खोलीभर. होय, त्याच्या घराची एक अख्खी खोली त्याच्या कपड्यांनी, रंगीबेरंगी शूज व हुडीने भरलेली आहे. त्याचं हे कलेक्शन पाहून चाहतेही हैराण आहेत.
फराह खानने करणच्या वाढदिवशी त्याच्या वार्डरोबचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडिओमधून फराह करणचा वॉर्डरोब दाखवते. अनेक प्रकारच्या हुडी, जॅकेट्स, टी-शर्ट्स, शर्ट, रंगीबेरंगी शूजने हा वार्डरोब खचाखच भरलेला दिसतोय.
करणचा हा वार्डरोब पाहून चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर चक्क याला धर्मा शॉपिंग सेन्टर म्हटलं आहे. सात जन्माचे कपडे एकाच जन्मात घालणार आहेस का? असा सवाल एका युजरने हा व्हिडीओ पाहून केला आहे. घरातचं मॉल उघडला आहे, अशी कमेंट एका युजरने केली आहे. देवा, प्रत्येकाला पुढच्या जन्मात करण जोहरच बनव, अशी भन्नाट कमेंट एका युजरने केली आहे.
‘हुनरबाज’ या शोमध्येही करणच्या कपड्यांचीच चर्चा रंगली होती. करण या शोचा जज होता. शोमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये तो स्टायलिश कपडे घालून यायचा आणि दरवेळी घातलेल्या ड्रेसच्या डिझायनरचं नाव सांगायचा. त्या डिझाईनरचं नाव ना कुणाला समजायचं, ना ते कुणी ऐकलं असायचं. असं का? हे त्याचा वार्डरोब पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच.