Actor Sathish Vajra Dead: अभिनेता सतीश वज्रचा गूढ मृत्यू, रक्ताच्या थारोळ्यात घरात आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 12:42 IST2022-06-21T12:39:52+5:302022-06-21T12:42:14+5:30

Actor Sathish Vajra Dead: मनोरंजन विश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Kannada actor Sathish Vajra found murdered | Actor Sathish Vajra Dead: अभिनेता सतीश वज्रचा गूढ मृत्यू, रक्ताच्या थारोळ्यात घरात आढळला मृतदेह

Actor Sathish Vajra Dead: अभिनेता सतीश वज्रचा गूढ मृत्यू, रक्ताच्या थारोळ्यात घरात आढळला मृतदेह

Actor Sathish Vajra Dead: मनोरंजन विश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कन्नड सिनेमाचा दिग्गज अभिनेता सतीश वज्र (Sathish Vajra ) याचा मृतदेह त्याच्या घरात आढळून आला. सतीश बेंगळुरूच्या आरआर नगरात राहायचा. सतीशच्या मृत्यूच्या बातमीने कन्नड चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. चाहते सुन्न आहेत.
रिपोर्टनुसार, अज्ञात व्यक्तीने सतीशची हत्या केली. रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह आढळून आला. तीन महिन्यांआधी सतीशच्या पत्नीने आत्महत्या केली होती. 

सतीशची हत्या त्याच्या मेहुण्याने केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सतीश वज्र ज्या घरात राहायचा, त्या घराच्या मालकाने घरातून रक्त बाहेर येताना पाहिलं. त्याने लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता, सतीशचा मृतदेह घराच्या फ्लोरवर पडलेला होता.

सतीशने कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. त्याच्या व त्याच्या पत्नीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. यामुळे दोन्ही कुटुंबात कलह, वाद सुरू होता. कथितरित्या याचमुळे सतीशच्या पत्नीने तीन महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर तिच्या भावाने सूड भावनेतून सतीशची हत्या केल्याचा संशय आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Web Title: Kannada actor Sathish Vajra found murdered