कंगनाला आणखीन एक झटका, सोनू सूदनंतर 'या' अभिनेत्रीने सोडला 'मणिकार्णिका' सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 17:16 IST2018-09-07T17:11:45+5:302018-09-07T17:16:30+5:30

कंगनाचा आगामी सिनेमा मणिकार्णिकाच्या मागे लागल्या अडचणी काही केल्या संपायचे नाव घेत नाहीत. सोनू सूदने सिनेमाचे शूटिंग अर्धवट सोडल्यानंतर आणखीन एक अभिनेत्रीने हा सिनेमा सोडल्याचे कळते.

Kangna got another shock, after sonu sud this actress also leave manikarnika | कंगनाला आणखीन एक झटका, सोनू सूदनंतर 'या' अभिनेत्रीने सोडला 'मणिकार्णिका' सिनेमा

कंगनाला आणखीन एक झटका, सोनू सूदनंतर 'या' अभिनेत्रीने सोडला 'मणिकार्णिका' सिनेमा

ठळक मुद्देमणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाचे मेकिंग बजेट 150 कोटींपेक्षा जास्त आहेस्वाती सेमवाल हिने काम करण्यास नकार दिला आहे

कंगनाचा आगामी सिनेमा मणिकार्णिकाच्या मागे लागल्या अडचणी काही केल्या संपायचे नाव घेत नाहीत. सोनू सूदने सिनेमाचे शूटिंग अर्धवट सोडल्यानंतर आणखीन एक अभिनेत्रीने हा सिनेमा सोडल्याचे कळते. सिनेमात सोनू सूदच्या पत्नीची भूमिका साकारण्याऱ्या स्वाती सेमवाल हिने काम करण्यास नकार दिला आहे. मीडिया रिपोर्टनुसार स्वाती ही सोनूची चांगली मैत्रीण आहे त्यामुळे तिने सिनेमात काम करण्यास नकार दिला आहे. स्वातीने सांगितले की 15 दिवसांपूर्वी मला फोन आला होता. त्यांना माझ्यासोबत 10 दिवसांचे शूटिंग करायचे होते. मी सिनेमाचे शूटिंग आधीच पूर्ण केले आहे.  

याआधी कंगनाच्या या सिनेमाचे दिग्दर्शन कृष करत होते. मात्र कंगानाला त्यांचे दिग्दर्शन काही कळले नाही. त्यानंतर कंगनाने सिनेमाच्या टीमशी बोलून स्वत: दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला.  कंगनाच्या उर्मट वागण्याला कंटाळून सोनू सूदने हा चित्रपट सोडल्याचे म्हटले गेले होते. यानंतर कंगनाने याप्रकरणी खुलासा करत, सोनूला एका महिला दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करायचे नव्हते. त्याचा पुरूषी अहंकार दुखावला, असे  तिने म्हटले होते़. 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' हा सिनेमा झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारीत आहे. कंगना राणौत ही राणी लक्ष्मीबाईंच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातून अंकिता लोखंडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाचे मेकिंग बजेट 150 कोटींपेक्षा जास्त आहे. २५ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Kangna got another shock, after sonu sud this actress also leave manikarnika