शुक्र है, बच गई! बिनधास्त कंगना राणौतचे बिनधास्त उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 18:30 IST2018-07-04T18:28:07+5:302018-07-04T18:30:22+5:30

कंगना राणौत तिच्या बिनधास्त आणि तितक्याच धाडसी विधानांसाठी ओळखली जाते. या अशा स्वभावाने कंगनाने अनेक वाद ओढवून घेतले. अनेक प्रकारची टीका सहन केली. पण या टीकेला, वादांना घाबरेल ती कंगना कुठली.

kangana ranaut true answer on marriage question | शुक्र है, बच गई! बिनधास्त कंगना राणौतचे बिनधास्त उत्तर!!

शुक्र है, बच गई! बिनधास्त कंगना राणौतचे बिनधास्त उत्तर!!

कंगना राणौत तिच्या बिनधास्त आणि तितक्याच धाडसी विधानांसाठी ओळखली जाते. या अशा स्वभावाने कंगनाने अनेक वाद ओढवून घेतले. अनेक प्रकारची टीका सहन केली. पण या टीकेला, वादांना घाबरेल ती कंगना कुठली. कंगनाने आपला बिनधास्तपणा सोडला नाही. तसेच बोल्ड गोष्टी करायला अन् बोलायलाही ती घाबरली नाही. ताज्या मुलाखतीत कंगनाला तिच्या लग्नाबद्दल विचारले गेले. यावरही कंगनाने असेच बिनधास्त उत्तर दिले.
तू कधी लग्न करणार, असा प्रश्न तिला केला गेला. सर्वप्रथम या प्रश्नावर कंगना खळखळून हसली अन् पुढे ‘शुक्र है, बच गई,’ असे उत्तर तिच्या तोंडून बाहेर पडले. आयुष्यात मला जे काही मिळाले, त्यात मी आनंदी आहे. मी ज्या गोष्टीची अपेक्षा केली, ती गोष्ट माझ्यासाठी वाईटचं ठरली. लग्नाचेही तसेच. मला जेव्हा जेव्हा एखाद्यासोबत लग्न करावेसे वाटले, तेव्हा तेव्हा वाईट गोष्टीचं माझ्या समोर आल्यात. पण मी आनंदी आहे. किमान त्या गोष्टींमुळे मी लग्न करण्यापासून वाचले. त्यामुळे प्रत्येकवेळी मी यासाठी देवाचे आभार मानते. थँक्यू गॉड, आपने मुझे बचा लिया, हेच माझे शब्द असतात, असे कंगना म्हणाली.
अन्य सेलिब्रिटीप्रमाणे कंगनाने कधीच स्वत:चे लव्ह लाईफ वा रिलेशन लपवले नाही. सध्या कंगना ‘मेंटल है क्या’ आणि ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटात बिझी आहे. ‘मेंटल है क्या’ या चित्रपटात ती राजकुमार रावसोबत दिसणार आहे. तर मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या सिनेमात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

 

Web Title: kangana ranaut true answer on marriage question