इंग्रजीवरुन हिणवणाऱ्या सोनम कपूरवर कंगनाचा निशाणा, म्हणाली, 'फिल्म माफियांकडून मी...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 09:29 IST2023-07-12T09:28:41+5:302023-07-12T09:29:43+5:30

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोवरही केला पलटवार

kangana ranaut takes jibe at sonam kapoor who once mocked kangana for her english language in koffee with karan | इंग्रजीवरुन हिणवणाऱ्या सोनम कपूरवर कंगनाचा निशाणा, म्हणाली, 'फिल्म माफियांकडून मी...'

इंग्रजीवरुन हिणवणाऱ्या सोनम कपूरवर कंगनाचा निशाणा, म्हणाली, 'फिल्म माफियांकडून मी...'

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने (Kangana Ranaut) पुन्हा एकदा करण जोहरवर (Karan Johar) निशाणा साधला आहे. फक्त करणच नाही तर तिन सोनम कपूरलाही (Sonam Kapoor) धारेवर धरलंय. करणचा टॉक शो 'कॉफी विद करण' मध्ये सोनम कपूरने कंगनाच्या इंग्रजीवरुन वक्तव्य केलं होतं. तिने कंगनाच्या इंग्रजीची खिल्ली उडवली होती. त्याच जुन्या एपिसोडचा स्क्रीनशॉट शेअर करत कंगनाने पुन्हा एकदा बॉलिवूड माफियांविरोधात आवाज उठवला आहे.

कंगनाने पोस्ट शेअर करत लिहिले, 'फिल्ममाफियांविरोधात गेल्या काही वर्षांपासून मी आवाज उठवत आहे. यातून मी एकच शिकले की बाहेरुन इंडस्ट्रीत आलेल्या कोणाही व्यक्तीला त्याच्या इंग्रजी भाषेवरुन आता कोणीच हिणवू शकत नाही. तो शो आता अधिकृतरित्या बंद झाला आहे.'

कंगनाने पुढे लिहिले, 'मी शेवटी त्यांना दिलेलं सडेतोड उत्तर बघायला विसरु नका. २४ व्या वर्षी मला ज्याप्रकारे हिणवलं गेलं तरी मी ज्या आत्मविश्वासाने आणि माणुसकीने वागले. हे इंग्लिश बोलणाऱ्या या गॉसिप आँटींना कधीच जमणार नाही.'

कंगनाने पुन्हा जुन्या आठवणी काढत सोनम कपूरला पलटवार दिला आहे. तसंच करणचा शो आता अधिकृतपणे बंद पडला असल्याने तिने एकप्रकारे आनंदच व्यक्त केलाय. कंगना लवकरच 'इमर्जन्सी' या सिनेमात दिसणार आहे. यामध्ये ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहे. तसंच तिचा 'तेजस' हा सिनेमा देखील रिलीज होणार आहे. यामध्ये ती पायलटच्या भूमिकेत आहे. याचा फर्स्ट लुक नुकताच शेअर करण्यात आलाय.

Web Title: kangana ranaut takes jibe at sonam kapoor who once mocked kangana for her english language in koffee with karan