अमित शाहांच्या ट्विटवर प्रकाश राज खोचक बोलले, कंगना रणौत भडकली अन् म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2023 17:34 IST2023-09-15T17:33:45+5:302023-09-15T17:34:35+5:30

प्रकाश राज यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत ट्वीट केलं आहे. या ट्वीटवरुन बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने त्यांना सुनावलं आहे. 

kangana ranaut slams prakash raj for his tweet on home minister amit shah hindi divas | अमित शाहांच्या ट्विटवर प्रकाश राज खोचक बोलले, कंगना रणौत भडकली अन् म्हणाली...

अमित शाहांच्या ट्विटवर प्रकाश राज खोचक बोलले, कंगना रणौत भडकली अन् म्हणाली...

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते प्रकाश राज सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. समाजातील घडामोडींवर ते अनेकदा ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. इस्त्रोच्या चांद्रयान ३बाबत केलेल्या ट्वीटमुळे प्रकाश राज यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत त्यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आहे. या ट्वीटवरुन बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने त्यांना सुनावलं आहे. 

१४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. हिंदी दिवसानिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. "भारतातील विविध भाषांना एकत्र आणण्याचं काम हिंदीने केलं आहे. स्वातंत्र्य लढ्यापासून आजपर्यंत देशातील एकजूटीसाठी हिंदीची महत्त्वाची भूमिका आहे," असं अमित शाह म्हणाले होते. अमित शाह यांच्या या वक्तव्यानंतर प्रकाश राज यांनी ट्वीट केलं होतं. 

'सिंघम ३'चा व्हिलन ठरला! रोहित शेट्टीच्या चित्रपटात सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री

"तुम्ही हिंदी बोलता कारण तुम्हाला हिंदी भाषा माहीत आहे. तुम्ही आम्हाला हिंदी बोलायला सांगता कारण तुम्हाला फक्त हिंदी भाषाच माहीत आहे," असं ट्वीट प्रकाश राज यांनी केलं होतं. त्यांच्या या ट्वीटवरुन कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे.

'जवान'साठी घेतलेल्या मानधनाबाबत दीपिका पदुकोणचा मोठा खुलासा, म्हणाली, "मी या चित्रपटासाठी..."

प्रकाश राज यांचं ट्वीट कंगनाने रि्वीट करत "अमित शाह गुजरातचे आहेत आणि त्यांची मातृभाषा गुजराथी आहे," असं कंगनाने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. अमित शाह यांच्याबद्दल केलेल्या ट्वीटमुळे प्रकाश राज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

Web Title: kangana ranaut slams prakash raj for his tweet on home minister amit shah hindi divas