आयुषमान म्हणजे 'चापलूस आऊटसायडर'; कंगना राणौतच्या नव्या वक्तव्याने पुन्हा फुटलं वादाला तोंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 11:15 IST2024-09-03T11:15:13+5:302024-09-03T11:15:37+5:30

कंगना राणौतने आयुषमान खुराणाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे (kangana ranaut, ayushman khurana)

kangana ranaut slam ayushman khurana for and call him chaplusi outsider emergency release controversy | आयुषमान म्हणजे 'चापलूस आऊटसायडर'; कंगना राणौतच्या नव्या वक्तव्याने पुन्हा फुटलं वादाला तोंड

आयुषमान म्हणजे 'चापलूस आऊटसायडर'; कंगना राणौतच्या नव्या वक्तव्याने पुन्हा फुटलं वादाला तोंड

कंगना राणौत सध्या तिच्या आगामी 'इमर्जन्सी' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील कंगनाच्या भूमिकेचं खूप कौतुक होतंय. 'इमर्जन्सी' सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. कंगना राणौतच्या सिनेमावर एका विशिष्ट समुदायने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे रिलीजला अवघे ५ दिवस बाकी असताना सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आलीय. अशातच कंगनाचं आणखी एक वक्तव्य चर्चेत आलंय. कंगनाने आयुषमानला चापलूस आऊटसायडर असं म्हणाली आहे. काय आहे यामागचं कारण

कंगना आयुष्मानला चापलूस असं का म्हणाली?

कंगना राणौत आगामी 'इमर्जन्सी' सिनेमाच्या निमित्ताने 'आप की अदालत'मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिने आयुषमान खुराणाबद्दल हे वक्तव्य केलं. कंगना म्हणाली, "तोच होता ज्याने माझ्यावर टीकेचा भडीमार केला होता. जेव्हा तो यशस्वी अभिनेता नव्हता तेव्हा एका इंटरव्ह्यू दरम्यान त्याने मला रोल मॉडेल मानलं होतं. पण जेव्हा त्याला इंडस्ट्रीत काम मिळायला लागलं तेव्हा त्याने माझ्यावर टीका केली. काम मिळवण्यासाठी तो चापलूसी करतो. या महान पवित्र इंटस्ट्रीमध्ये कोणाला कोणासोबत काही समस्या नाही. सर्वांना फक्त माझ्याशी प्रॉब्लेम आहे."

स्टारकिड्सवरही कंगना राणौतचा राग 

कंगना राणौतने नंंतर स्टारकिड्सबद्दल राग व्यक्त केला. ती म्हणाली, "लोकांना अशा अभिनेत्यांना बघायचं जे रस्त्यावर, लोकांमध्ये असलेले, उन्हात पोळलेले असतील. त्यांनी खूप संघर्ष केला असेल. मला इंदिरा गांधींची भूमिका साकारण्यासाठी वाढत्या वयाला अनुसरुन ट्रीटमेंट घ्यावी लागली. परंतु हे स्टारकिड्स प्रत्येक भूमिकेसाठी जिममध्ये जातात आणि बोटॉक्स ट्रीटमेंट घेतात. प्रामाणिकपणे सांगायचं तर मी कोणावर टीका करत नाहीय. मी फक्त इतकंच म्हणतेय की, त्यांनी घराबाहेर पडलं पाहिजे. पण त्याऐवजी हे स्टारकिड्स कारमधून बाहेर पडतात. ४० वर्षांच्या स्टारकिड्स गुलाबी चष्मा लावून लहान मुलांसारखं वागतात."

Web Title: kangana ranaut slam ayushman khurana for and call him chaplusi outsider emergency release controversy