रामलल्लाच्या दर्शनासाठी साडी देण्यास नीना गुप्ताच्या लेकीनं दिला होता नकार, कंगनाचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:50 IST2026-01-20T12:56:14+5:302026-01-20T13:50:04+5:30

कंगना राणौत आणि बॉलिवूडमधील वाद काही नवीन नाहीत, मात्र यावेळी कंगनाने केलेल्या खुलाशानं अनेकांना धक्का बसला आहे.

Kangana Ranaut Reveals Bollywood Designer Masaba Gupta Refusing Saree For Ram Janmabhoomi Visit | रामलल्लाच्या दर्शनासाठी साडी देण्यास नीना गुप्ताच्या लेकीनं दिला होता नकार, कंगनाचा खुलासा

रामलल्लाच्या दर्शनासाठी साडी देण्यास नीना गुप्ताच्या लेकीनं दिला होता नकार, कंगनाचा खुलासा

Kangana Ranaut on Masaba Gupta : अभिनयाच्या क्षेत्रातून राजकारणात पाऊल टाकलेली 'क्वीन' कंगना राणौत ही नेहमीच चर्चेत असते. कोणतीही भीडभाड न ठेवता कोणत्याही विषयावर ती अगदी स्पष्टपणे बोलताना दिसते. आता कंगना हिने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कंगनानं प्रसिद्ध फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता हिच्यावर निशाणा साधला आहे. अयोध्यातील रामजन्मभूमीच्या उद्घाटनावेळी कंगनानं फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताची साडी नेसली होती. मात्र, डिझायनरने तिला साडी नेसू नको, असे थेट सांगितले होते. तसेच ब्रँडचे नावही घेऊ नये, असेही सांगितले होते.  पण, कंगनाने आधीच साडी नेसली होती आणि ती सोहळ्यासाठी निघाली होती, ज्यामुळे खूप अपमानित वाटल्याचं कंगनानं सांगितलं.

कंगना रणौतने सोशल मीडियावर खुलासा केला की, "मी कधीही विसरणार नाही असा एक माझ्यासोबत प्रसंग घडला. रामजन्मभूमी  उद्घाटनासाठी मला फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताची साडी नेसायची होती. दरम्यान, मसाबा गुप्ताने तिच्या स्टायलिस्टला, कार्यक्रमासाठी साडी नेसू नये आणि ब्रँडचे नाव न घेण्यास सांगायला सांगितले.  परंतु, मी आधीच साडी नेसली होती. तसेच लखनऊहून अयोध्येच्या दिशेनं निघाली होती.  मला तेव्हा प्रचंड अपमानित वाटलं", असं तिनं पोस्टद्वारे सांगितलं.


कंगनाने या घटनेबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, तिची स्टायलिस्ट खूप दयाळू होती. मसाबाने नकार दिल्यावर स्टायलिस्टला खूप लाज वाटली. तिने गुपचूप कंगनाला सांगितले की, "मसाबा किंवा तिच्या ब्रँडला टॅग करू नका, साडीचे पैसे मी स्वतःच्या खिशातून दिले आहेत". कंगना पोस्टमध्ये म्हणाली, "काही फॅशन डिझायनर्स सुरूवातीला तिचे मित्र होतात. नंतर दूर जातात, पाठिंबा देणे बंद करतात. या गोष्टीचा प्रचंड त्रास होतो". सध्या कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, मसाबा गुप्ताने नेमकं असं का केलं? असा प्रश्न आता नेटकरी उपस्थित करत आहेत.

Web Title : राम लल्ला के दर्शन के लिए मसाबा ने साड़ी से किया इनकार: कंगना

Web Summary : कंगना रनौत ने खुलासा किया कि मसाबा गुप्ता नहीं चाहती थीं कि वह राम मंदिर के उद्घाटन के लिए उनके ब्रांड की साड़ी पहनें और ब्रांड का उल्लेख न करने को कहा। कंगना को अपमानित महसूस हुआ क्योंकि वह पहले से ही इसे पहने हुए थीं।

Web Title : Masaba refused saree for Ram Lalla darshan: Kangana reveals incident.

Web Summary : Kangana Ranaut revealed Masaba Gupta didn't want her to wear a saree of her brand for Ram Mandir inauguration and asked not to mention brand. Kangana felt humiliated as she was already wearing it.