चित्रपटाच्या नावावर कचरा विकू नका...., कंगना राणौतने उडवली दीपिकाच्या ‘गहराइयां’ची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 10:58 IST2022-02-13T10:57:40+5:302022-02-13T10:58:49+5:30

दीपिका पादुकोणचा  (Deepika Padukone)  ‘गहराइयां’  हा सिनेमा अव्हरेज असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut)  हिनेही दीपिकाच्या या सिनेमावर तिचं मत व्यक्त केलं आहे.

kangana ranaut remarks on deepika padukone gehraiyaan | चित्रपटाच्या नावावर कचरा विकू नका...., कंगना राणौतने उडवली दीपिकाच्या ‘गहराइयां’ची खिल्ली

चित्रपटाच्या नावावर कचरा विकू नका...., कंगना राणौतने उडवली दीपिकाच्या ‘गहराइयां’ची खिल्ली

दीपिका पादुकोणचा  (Deepika Padukone)  ‘गहराइयां’  (Gehraiyaan) हा सिनेमा रिलीज झालाय. सिनेमाला संमिश्र प्रतिसाद मिळतोय. सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला असल्याने कमाईचा काहीही सीन नाही. पण हो, सिनेमा अव्हरेज असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता अभिनेत्री कंगना राणौत  (Kangana Ranaut)  हिनेही दीपिकाच्या या सिनेमावर तिचं मत व्यक्त केलं आहे. एक वाईट सिनेमा वाईटचं असतो, अशा शब्दांत दीपिकाच्या या सिनेमावर तिने टीका केली आहे.
कंगनाने इन्स्टा स्टोरीवर मनोज कुमार व माला सिन्हा यांच्यावर चित्रीत ‘चांद सी महबूबा हो मेरी’ शेअर केलं आहे. 1965 साली आलेल्या ‘हिमालय की गोद में’ या चित्रपटातील या गाण्यात  मनोज कुमार नदीकाठी गाणं गातोय तर माला सिन्हा डान्स करतेय. हे गाणं शेअर करत कंगनाने सोबत एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.

यात ती लिहिते, ‘मी सुद्धा मिलेनियल आहे. पण मी असा रोमान्स समजू शकते. पण अलीकडे मिलेनियल,मॉर्डन असल्याच्या नावावर भलतंच काही दाखवलं जातंय. प्लीज असं करू नका. एक वाईट सिनेमा नेहमी वाईटच असतो. मग तुम्ही त्यात कितीही अंगप्रदर्शन करा, पोर्नोग्राफी दाखवा. हे दाखवून तुम्ही सिनेमा हिट करू शकत नाही आणि ही फॅक्ट आहे की, कोणतीच ‘गहराइयां’वाली गोष्ट नाहीये.’
या पोस्टमधून कंगनाने अप्रत्यक्षणे दीपिकाच्या ‘गहराइयां’ या सिनेमाची खिल्ली उडवली आहे.

अलीकडे ‘लॉक अप’ या आपल्या शोच्या लॉन्च इव्हेंटवर कंगनाला दीपिकाच्या ‘गहराइयां’ या सिनेमाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर कंगना भडकली होती. मी इथे दीपिकाचा सिनेमा प्रमोट करायला बसलेली नाही, अशा शब्दांत तिने प्रश्न विचारणाºया पत्रकाराला फटकारलं होतं.

Web Title: kangana ranaut remarks on deepika padukone gehraiyaan