Kangana Ranaut : आश्चर्य ! चक्क कंगनाने केली 'पठाण'ची स्तुती, म्हणाली, 'मी ऐकलं पठाणने...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 12:48 IST2023-01-26T12:47:57+5:302023-01-26T12:48:39+5:30

नुकतीच कंगना तिच्या आगामी 'इमर्जन्सी' (Emergency) या सिनेमाच्या एक इव्हेंटसाठी पोहोचली होती.

kangana ranaut praises shahrukh khan film pathaan says film should work good | Kangana Ranaut : आश्चर्य ! चक्क कंगनाने केली 'पठाण'ची स्तुती, म्हणाली, 'मी ऐकलं पठाणने...'

Kangana Ranaut : आश्चर्य ! चक्क कंगनाने केली 'पठाण'ची स्तुती, म्हणाली, 'मी ऐकलं पठाणने...'

Kangana Ranaut : बॉलिवुडची क्वीन कंगना रणौत ट्विटरवर परतताच तिने बॉलिवुडकरांवर निशाण्यावर धरण्यास सुरुवात केली होती. नुकतेच पठाण (Pathaan) सिनेमाच्या रिलीजच्या दिवशीच ते कसे तुमच्या चेहऱ्यावर कमाईचे आकडे फेकतील असं ट्वीट केलं होतं. आता पठाणचं यश पाहता कंगनाता सूर मावळला दिसतोय. तिने चक्क पठाणची स्तुती केली आहे.

नुकतीच कंगना तिच्या आगामी 'इमर्जन्सी' (Emergency) या सिनेमाच्या एक इव्हेंटसाठी पोहोचली होती. यावेळी अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) देखील तिच्यासोबत होते. दरम्यान संधी बघताच माध्यमांनी दोघांनीही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यावेळी कंगना म्हणाली, 'मी ऐकलं पठाण सिनेमा चांगला चालत आहे. फिल्म चालली पाहिजे.'तर अनुपम खेर म्हणाले, खूप मोठी फिल्म आहे.'

कंगनाने पठाणची स्तुती केल्याने चर्चांना उधाण आले आहे. हे आश्चर्य कसे काय घडले असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. आमच्यासाठी ही सौभाग्याची बाब आहे की फिल्म चांगली चालत आहे. अशा फिल्म्स चालल्या पाहिजेत असे तिने म्हणले आहे. 

Kangana Ranaut : 'पठाण' रिलीजच्या दिवशीच कंगना म्हणते, 'ते तुमच्या चेहऱ्यावर कमाईचे आकडे फेकतील आणि...'

काल पठाण ८००० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी सिनेमाची क्रेझ बघून सगळेच अवाक झाले. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने आतापर्यंत २५ कोटींची कमाई केली आहे आणि पहिल्या दिवशी २२.१५ कोटी कमावलेल्या KGF 2 चा रेकॉर्ड मोडला आहे. बॉलीवूड तज्ज्ञांच्या मते 'पठाण'चे ओपनिंग डे कलेक्शन ५० कोटींच्या जवळपास असेल. असे झाल्यास, KGF-2 (५४ कोटी) नंतर हा देशातील सर्वात मोठा ओपनिंग हिंदी चित्रपट ठरेल.

Web Title: kangana ranaut praises shahrukh khan film pathaan says film should work good