"खूप हुशार अन् संस्कारी...", 'धुरंधर' फेम सारा अर्जुनच्या 'त्या' कृतीने भारावली कंगना राणौत; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 11:25 IST2026-02-17T11:14:58+5:302026-02-17T11:25:59+5:30
'धुरंधर' मधील यालिनाचं कंगना राणौतकडून कौतुक!'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

"खूप हुशार अन् संस्कारी...", 'धुरंधर' फेम सारा अर्जुनच्या 'त्या' कृतीने भारावली कंगना राणौत; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...
Kangana Ranaut Praise Sara Arjun: आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर हा चित्रपट २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.रणवीर सिंह आणि अक्षय खन्नाची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला.दरम्यान, चित्रपटात येलिना नावाची भूमिका साकारणारी सारा अर्जुन देखील चांगलाच भाव खाऊन गेली.या चित्रपटातील तिच्या अभिनयाने सारा अर्जुनने सर्वांचं मन जिंकलं. तिच्या कामाचं समीक्षकांसह प्रेक्षकांकडून देखील भरभरून कौतुक होत आहे. अशातच बॉलिवूडची धाकड गर्ल कंगणा रानौतने सारा अर्जुनचा एक शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत आहे.

अलिकडेच महाशिवरात्रीच्या निमित्ताने सारा अर्जुनने एका फाउंडेशनला भेट दिली. तिने या आश्रमातील एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. कंगनाने साराचा हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर री-शेअर करत तिचं कौतुक केलं आहे.या व्हिडीओला कॅप्शन देत तिने लिहिलंय, ही मुलगी कमाल आहे. हुशारी आणि संस्कारी आहे. आयुष्यात अशीच उल्लेखनीय कामगिरी करत राहा. माझ्या शुभेच्छा कायम तुझ्यासोबत असतील." असं सुंदर कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
सारा अर्जुनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणालेली, "नमस्कार... तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. मी खूप छान वेळ घालवला. इथे आल्याबद्दल खूप कृतज्ञ आणि स्वत ला भाग्यवान समजते. खरोखरच मी या भावना शब्दातही व्यक्त करू शकत नाही.आम्ही आतापर्यंत काही अद्भुत सादरीकरणे पाहिली आहेत. आणि मी नृत्य सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहते आहे." असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं.