Kangana Ranaut : दिल्लीच्या 'या' हॅण्डसम तरुणावर कंगना रणौत फिदा; सर्वांसमोर केलं Kiss, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 10:29 AM2022-05-18T10:29:28+5:302022-05-18T10:31:09+5:30

या व्हिडीओमध्ये दिसत आहे, की कंगना एका पार्टीत सहभागी झाली होती आणि तेथे तिने हँडसम दिसणाऱ्या शिवम नावाच्या एका तरुणाला पाहताच किस केले.

Kangana Ranaut heart came on handsome man from Delhi; Kiss in front of everyone, Video goes viral | Kangana Ranaut : दिल्लीच्या 'या' हॅण्डसम तरुणावर कंगना रणौत फिदा; सर्वांसमोर केलं Kiss, Video व्हायरल

Kangana Ranaut : दिल्लीच्या 'या' हॅण्डसम तरुणावर कंगना रणौत फिदा; सर्वांसमोर केलं Kiss, Video व्हायरल

googlenewsNext

नवी दिल्ली : चित्रपट अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिच्या विविध प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. ती नुकतीच तिच्या 'धाकड' चित्रपटामुळेही चर्चेत आली होती. सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असते. खरे तर, कंगनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, आता तिचा एक असा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 

या व्हिडीओमध्ये दिसत आहे, की कंगना एका पार्टीत सहभागी झाली होती आणि तेथे तिने हँडसम दिसणाऱ्या शिवम नावाच्या एका तरुणाला पाहताच किस केले. तिचा हा अंदाज पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. कंगना आणि शिवमचा हा पार्टीतील व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. 

खरे तर, कंगना होस्ट करत असलेल्या लॉकअप शोमधील एक कंटेस्टेंट शिवम शर्मा कंगनासोबत एक सेल्फी घेत असतो. यावेळी कंगना त्याला कीस करते. तीचा हा अंदाज पाहून शिवमदेखील आश्चर्यचकित होतो. या व्हिडिओवर कमेंट करत एका चाहत्याने म्हटले आहे, वा लकी मॅन, तर आणखी एका चाहत्याने म्हटले आहे, भावाची तर लॉटरी लागली. 

सध्या कंगना रनौत तिच्या 'धाकड' चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत एक्साइटेड आहे. या चित्रपटासाठी सलमान खाननेही तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तिचा हा चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होत आहे. कार्तिका आर्यनचा 'भूल भुलैया' हा चित्रपट कंगनाच्या धाकडला टक्कर देऊ शकतो.

Web Title: Kangana Ranaut heart came on handsome man from Delhi; Kiss in front of everyone, Video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.